Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… म्हणून पाकिस्तान होतोय कंगाल; कारण ऐकून वाटेल आश्चर्य; पहा, नेमके काय चाललेय शेजारी देशात..?

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील संकटांकडे दुर्लक्ष करुन तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानी राज्यकर्ते करत आहेत. मात्र, या प्रयत्नात देशात काय चालले आहे, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की देश चालवण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तान समोर आज अनेक संकटे आहेत. मात्र देश चालवण्याइतके पैसे नाहीत हे सर्वात मोठे आव्हान आहे. विदेशांकडून सतत कर्ज घेतले जात असल्याने या कर्जाचा ताण प्रचंड वाढला आहे. कर वसुली तर होत नाही. दुसरीकडे मात्र कर्जाचा ताण वाढला आहे. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

सध्या देशाच्या तिजोरीत खडखडाट आहे. उत्पन्न कमी आणि खर्च वाढला आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली व्यवस्थित कार्यान्वित करता आली नाही. त्यामुळे लोकांनीही कर भरला नाही. हे चांगले नाही. मात्र, लोकांच्या अद्याप हे लक्षात आलेले नाही. कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानकडे दहा वर्षांपूर्वी 6 ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. आता हे कर्ज तब्बल 30 ट्रिलियन डॉलर इतके वाढले आहे.

Advertisement

पाकिस्तान सध्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्यायही राहिलेला नाही. देश चालवायचा असेल तर पैसे पाहिजेत. देशावर आधीच मोठे कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देशासाठी आवश्यक योजना, प्रकल्पांसाठी पैसे आणायचे कुठून, असा मोठा प्रश्न आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. आता तर देश चालवण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे येथील राज्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

बाब्बो.. कंगाल पाकिस्तानला पाहिजे ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; पहा, या देशावर का आलीय अशी वेळ ?

Advertisement

अबब… पाकिस्तानात चाललेय काय? नागरिकांना मिळेना साधे गव्हाचे पिठ.. काय आहे प्रकरण

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply