Take a fresh look at your lifestyle.

खळबळजनक..! भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी.. कोणी दिलीय धमकी वाचा..

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि सध्या भाजपचा खासदार असणाऱ्या गौतम गंभीरला (Gautam Gambhir) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘इसिस काश्मीर’ या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीरने केलाय. याबाबत गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच गंभीरच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेतही माेठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Advertisement

दिल्लीच्या डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांच्या माहितीनुसार, “इसिस काश्मीर या दहशतवादी संघटनेने फोन व ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे. गौतम गंभीरने काल (ता. 23) रात्रीच याबाबत तक्रार दाखल केली आहे.”

Advertisement

दरम्यान, गौतम गंभीरला याआधीही दोन वर्षापूर्वी परदेशातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी खासदार गौतम गंभीरने शहादारा जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिले होते. त्यात “मला व माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून, माझी सुरक्षा वाढवण्यात यावी..” अशी मागणी गौतमने केली होती.

Advertisement

गंभीरचे क्रिकेट करिअर

Advertisement

भारतीय संघासाठी गौतम गंभीरने 58 कसोटी, 147 वन-डे, तर 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 58 कसोटीत 41.95 च्या सरासरीने त्याने 4154, तसेच 147 वन-डेमध्ये 5238 धावा, तर 37 टी-20 सामन्यांत 932 धावा केल्या आहेत.

Advertisement

2007 मध्ये झालेला टी-20 वर्ल्ड कप, तसेच 2011 मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने मोठ्या खेळ्या केल्या होत्या. त्यामुळे दोन्ही वेळा टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला होता. 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व सध्या तो राजकारणात उतरला आहे.

Advertisement

आनंदाची बातमी..! घरगुती गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात जमा झाली का? असे तपासा…!
बाप रे..! पुलवामा हल्ल्यासाठी रसायनांची खरेदी अमेझाॅनवरुन.. तपासात धक्कादायक गोष्टी समोर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply