Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अमेरिकेच्या ‘त्या’ निर्णयावर भडकलाय चीन; पहा, अमेरिकेचा नेमका काय आहे प्लान..?

वॉशिंग्टन : चीनच्या वाढत्या दादागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका नेहमीच नवे डाव टाकत असतो. आताही अमेरिकेने नवीन प्लान आखला आहे. चीनला या प्रकाराचा त्रास होणार आहे. मात्र, अमेरिकेने त्याचा विचार केलेला नाही. अमेरिकेने आता असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे चीन चांगलाच भडकला आहे. चीनने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकी दिली आहे.

Advertisement

अमेरिकेने समिट फॉर डेमोक्रसी या संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमलेनात चीन, पाकिस्तान, रशिया या देशांना निमंत्रण दिलेले नाही. मात्र, तैवानला आमंत्रण दिले आहे. अमेरिकेने हा प्रकार चीनला त्रास देण्यासाठीच केला आहे. अपेक्षेनुसार चीन संतापलाही आहे. रागाच्या भरात अमेरिकेला गंभीर परिणामांची धमकीही चिनी नेत्यांनी दिली आहे. मात्र, अमेरिकेने आपल्या निर्णयात अद्याप तरी बदल केलेला नाही. तैवाननेही अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Advertisement

चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता लिजियन यांनी सांगितले, की ‘अमेरिकेने या संमेलनात तैवानला आमंत्रण दिले असून या निर्णयाचा आम्ही तीव्र विरोध करतो. जगात फक्त एकच चीन आहे आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सरकार चीनचे प्रतिनिधीत्व करणारे एकमात्र कायदेशीर सरकार आहे. तैवान चीनचा अविभाज्य प्रांत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यात तैवानला अन्य कोणताही आंतरराष्ट्रीय दर्जा नाही. त्यामुळे अमेरिकेने वन चायना पॉलिसीचे पालन करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

‘अमेरिकेने तैवानला आधिक समर्थन देणे आता बंद केले पाहिजे. अशा प्रकारांमुळे अमेरिकेचेच नुकसान होत असून आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत आहे. अमेरिकेने हे जे काही संमेलन आयोजित केले आहे त्याचा उद्देश जगाचे विभाजन करणे असाच आहे. लोकशाहीचे नाव घेऊन अमेरिका वेगळेच राजकारण करत आहे,’ असा आरोप चीनने केला आहे.

Advertisement

दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयाचे तैवानने स्वागत केले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने अद्याप चीनला कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. या मुद्द्यावर आता अमेरिका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

तैवानचा मास्टरस्ट्रोक..! चीनच्या विरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चीनच्या धमक्याही ठरल्या फेल

Advertisement

… म्हणून तैवानवर भडकलाय चीन; रागाच्या भरात ‘तिथे’ केलाय ‘असा’ कारनामा; पहा, नेमका काय आहे वाद..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply