Take a fresh look at your lifestyle.

अरे वा.. मोदी सरकारने दिलीय मोठी खुशखबर..! ‘त्या’ महत्वाच्या योजनेस मिळालीय मुदतवाढ; पहा, नेमके काय म्हटलेय सरकारने..

नवी दिल्ली : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. कोरोना काळात सुरू केलेल्या या योजनेस मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्चपर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

Advertisement

देशातील 80 कोटी लोकांना 5 किलो अन्न मोफत देण्याची योजना 21 डिसेंबर ते 22 मार्चपर्यंत मुदतवाढ केली आहे. मागील वर्षात कोरोना महामारीमुळे सरकारने गरिबांना 5 किलो मोफत रेशन देण्याची योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 600 लाख मेट्रिक टन धान्य वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत राज्यांना 548 मेट्रिक टन वाटप करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 2 लाख 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असेही मंत्री ठाकूर यांनी सांगितले. ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने पुन्हा या योजनेस मुदतवाढ जाहीर केली आहे.

Advertisement

या योजनेंतर्गत देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना दरमहा 5 किलो गहू, तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबास एक किलो हरभरा मोफत देण्यात येत आहे. या योजनेमुळे देशातील गरीब लोकांना आधार मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांचा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या काळात अनेक लोक बेरोजगार झाले होते. आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे लोकांना मोफत रेशन उपलब्ध करुन देण्यास सुरुवात करण्यात आली होती. आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ही योजना मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply