Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : डिसेंबर महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद; बँक कामकाजाचे नियोजन करा

नवी दिल्ली : पुढील काही दिवसात बँकेच्या कामकाजाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. नोव्हेंबर महिन्याप्रमाणेच पुढील डिसेंबर महिन्यात सुद्धा बँकांना बऱ्याच सुट्ट्या आहेत. डिसेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असतील याबाबत रिजर्व बँकेने यादी जाहीर केली आहे. डिसेंबर महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. यामध्ये चार रविवारच्या सुट्ट्या आहेत.

Advertisement

सर्वच राज्यात एकाच वेळी बँकांना सुट्टी नाही. एका राज्यात बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यात बँका सुरू राहतील. त्यामुळे तुमचे बँकेत काही काम असेल तर आधी बँक सुरू आहे का, याची माहिती घेणे गरजेचे आहे. रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद असतील याचीही माहिती आरबीआयने दिली आहे.

Advertisement

3 डिसेंबर रोजी गोवा राज्यातील पणजी विभागातील बँकांना सुट्टी आहे. 5 डिसेंबर रोजी रविवार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे देशभरातील बँका बंद असतील. 12 डिसेंबरला रविवार आहे. 18 डिसेंबर रोजी शिलाँगमध्ये बँका बंद असतील. 19 डिसेंबर रोजी रविवार आहे. 24 डिसेंबर रोजी मिझोराम राज्यातील विभागातील बँकांना सुट्टी आहे. 25 डिसेंबर रोडी भुवनेश्वर आणि बंगळुरू वगळता देशभरात सर्वत्र बँका बंद राहतील. त्यानंतर 26 डिसेंबरला चौथा शनिवार आहे. 26 डिसेंबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी एजवाल, 30 डिसेंबर शिलाँग आणि 31 डिसेंबर रोजी मिझोराम राज्यात विभागातील बँका बंद असतील.

Advertisement

महत्वाची बातमी : नोव्हेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; बँक कामकाजाचे नियोजन करा

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply