Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर 2050 पर्यंत जगातील निम्म्या लोकांना घ्यावा लागेल चष्मा; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

मुंबई : आपल्या रोजच्या जीवनातील सवयी थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आताच्या हायटेक जमान्यात तर बहुतेक कामकाज ऑनलाइन होत आहे. त्यामुळे कॉम्प्यूटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. या गोष्टी नसतील काहीच कामकाज करणे शक्य होणार नाही, असा आजचा काळ आहे. यामुळे दैनंदीन कामकाज सोपे होत असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे अनेक संशोधानांतून समोर आले आहे. आताही द लॅन्सेट डिजिटल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संबंधित अभ्यासात संशोधकांनी एक भविष्यवाणी केली आहे.

Advertisement

संशोधकांचे म्हणणे आहे, की जगभरातील लोक स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा परिणाम डोळ्यांवर होणार आहे. त्यामुळे लोकांना चष्म्याची गरज पडणार आहे. फोन आणि टॅबचा जास्त वापर होत असल्याने दिसण्याची क्षमता कमी किंवा मायोपिया या आजाराचा धोका 30 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरचा जास्त वापर करतात त्यांना याचा धोका 80 टक्क्यांपर्यंत आहे. यासाठी 3 महिने ते 33 वर्षे वयोगटातील मुले आणि युवकांची तपासणी करण्यात आली.

Advertisement

कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरातील लोकांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. लहान मुलांच्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. या रिसर्चनुसार, ब्रिटेनमधील प्रत्येकी तीन पैकी एका व्यक्तीवर याचा परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढलेल्या स्क्रीन टाइमचा सर्वाधिक परिणाम भारतासह आशियातील अन्य देशांतील लोकांवर होणार आहे. कारण, जगातील अन्य देशांच्या तुलनेत येथे लोकसंख्या जास्त आहे. ज्या देशात जितके जास्त स्मार्टफोन असतील त्या देशातील लोकांच्या डोळ्यांवर जास्त परिणाम होईल. नेत्रतज्ज्ञांच्या मते, मायोपिया या आजारात रुग्णास दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. यामध्ये डोळ्याचा आकार बदलतो.

Advertisement

सध्याच्या परिस्थितीत स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांचा वापर वाढत आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे लोकांनीही आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

Advertisement

बाब्बो.. म्हणून 2050 पर्यंत 50 % लोकांना होणार मायोपिया; वाचा अन काळजी घ्या

Advertisement

अर्र.. ‘वर्क फ्रॉम होम’ ने आणलेत ‘हे’ आजार; ‘या’ उपायांनी अशी घ्या आरोग्याची काळजी

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply