Take a fresh look at your lifestyle.

गाल-बाल सुंदर ठेवण्यासाठी ‘खा’ कॅल्शियम..! होय, वाचा की महत्वाच्या टिप्स

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक असल्याचे आपणास माहित असेलच. यासह चकाकणारे सुंदर गाल आणि केस चमकदार होण्यासाठीही ते तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक भारतीय कॅल्शियम मिळविण्यासाठी दुधावर अवलंबून असतात. पण ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा ज्यांना दूध पचत नाही त्यांचे काय? त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अशा कॅल्शियम युक्त पदार्थांची यादी, जे तुमची चव वाढवतील आणि तुमची त्वचा तसंच केस सुंदर आणि दाट करतील. (marathi tips for Long Hair and skin With Calcium Rich Foods)

Advertisement

राजमा, चणे आणि इतर कडधान्ये हे प्रथिने तसेच कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. तुम्ही दररोज त्यांचे सेवन केले पाहिजे आणि दिवसातून एकदा तरी 1 ते 2 वाट्या डाळी खाव्यात. हे तुमचे केस आणि गाल दोन्ही सुंदर बनवण्याचे काम करेल. राजगिरी या नावाने प्रसिद्ध असलेला राजगिरा हा एक सूडोसीरियल (Pseudocereal) आहे. ज्याचा वापर पिठाच्या स्वरूपात आणि संपूर्ण धान्य म्हणून देखील केला जातो. राजगिरीच्या पिठात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजसारखे गुणधर्म असतात. आपण ते ब्रेड आणि संपूर्ण धान्य स्वरूपात वापरू शकता.

Advertisement

भाजीमध्ये अनेक प्रकारच्या शेंगा खाल्ल्या जातात. त्यांचा आकार वेगळा असण्याबरोबरच त्यांची चवही वेगळी आहे. मटारापासून चवळी, बीन्स, ड्रमस्टिक, शेव बीन्स शरीराला कॅल्शियम मिळवण्यास मदत करतात. काही फोर्टिफाइड पेय देखील बाजारात उपलब्ध आहेत, जे जीवनसत्त्वे आणि खनिजे मिसळून तयार केले जातात. सोया दूध देखील एक द्रव पदार्थ आहे जे तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करते. कोणतीही भाजी फक्त एकाच स्वरूपात खाल्ली तर ती कंटाळवाणी होऊ लागते. पण या पालेभाज्या चपाती, पुरी, कचोरी, डाळ, भाजी आणि खिचडीमध्ये मिसळून खाल्ल्यास टेस्ट आणि पोषणही मिळेल.

Advertisement

Advertisement

Leave a Reply