Take a fresh look at your lifestyle.

हवामान बदलाचा ‘त्यांना’ असा बसलाय फटका; पहा, 40 वर्षात युरोपमध्ये काय घडलेय..?

नवी दिल्ली : सध्या हवामान बदलाचे संकट जगासमोर उभे राहिले आहे. हे संकट काही एका दिवसात आलेले नाही. आता मात्र या संकटाने आधिक घातक रुप धारण केले आहे. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही या संकटाचा फटका बसत आहे. एक काळ असा होता की आपल्याला सर्वत्र हजारो पक्षी दिसायचे. मात्र, आता पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. युरोपमध्ये गेल्या 40 वर्षांच्या काळात पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे समोर आले आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे असे घडल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

Advertisement

हवामानातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे युरोपमध्ये पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 1980 पासून हा प्रकार सुरू आहे. तुम्हास ऐकून आश्चर्य वाटेल पण, मागील 40 वर्षांत तब्बल 6 कोटी पक्षी गायब झाले आहेत. रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्डस संस्थेचे रिचर्ड ग्रेगरी म्हणाले, की या महत्वाच्या मुद्द्याकडे कुणीही लक्ष देत नाही. या घटना आपणास लवकर जाणवत नाहीत. मात्र, पक्षी हळूहळू गायब होत चालले आहेत. आश्चर्य म्हणजे, 1980 पासून चिमण्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. चिमण्यांच्या संख्येत 60 टक्के घट झाली आहे. सध्या येथे चिमण्यांची संख्या 7.5 कोटी इतकी आहे.

Advertisement

बर्डलाइफ युरोप संवादाचे अंतरिम प्रमुख एना स्टेनेवा म्हणाले, की सामान्य पक्षी कमी होत चालले आहेत. यास आपण कारणीभूत आहोत. युरोपमधील देशांच्या सरकारांनी आता निसर्गाकडे आधिक लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर भविष्यात आधिक गंभीर परिणाम होतील. असे का होत आहे याची अनेक कारणे असू शकतात.

Advertisement

सध्या ज्या पक्ष्यांची संख्या जास्त आहे, अशा पक्ष्यांची संख्या घटत आहे. 2019 मध्ये उत्तर अमेरिकेतील एका अभ्यासात असे आढळून आले की तिथेही असेच काहीसे घडत आहे.

Advertisement

खबरदारी : हवामान बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढला, `हे` चार उपाय तुम्हाला ठेवतील सुरक्षित

Advertisement

हवामान बदल म्हणजे वैश्विक आणीबाणी; पहा नेमके काय आलेत सर्वेक्षणाचे मुद्दे

Advertisement
Advertisement

Leave a Reply