Take a fresh look at your lifestyle.

भारीच की… शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा..! आता गुगल देणार ‘तो’ महत्वाचा अपडेटही

पुणे : जगभरातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे चक्रीवादळे, मुसळधार पाऊस अशी नैसर्गिक संकटे येत आहेत. भारतातही या घटना घडत असतात. या हवामान बदलांचे नुकसानही सहन करावे लागते. हवामानात होणाऱ्या बदलांची माहिती हवामान विभागाकडून मिळत असते. आता या कामी गुगल कंपनी सुद्धा मदत करणार आहे. हवामानात होणाऱ्या बदलांची योग्य माहिती गुगल भारतीयांना देणार आहे.

Advertisement

हवामान बदल आणि हवामानाचे अपडेट अत्यंत वेगाने कसे देता येईल, यावर गुगल सध्या काम करत आहे. यामुळे लोकांना रियल टाइम इन्फर्मेशन मिळणार आहे. म्हणजेच, हवामान विभागाकडून ज्या पद्धतीने अपडेट मिळतात त्या पद्धतीने गुगलही हवामानाचे अपडेट देणार आहे. देशात सध्या हवेचा दर्जा सातत्याने खराब होत आहे. वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा अत्यंत घातक परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. हवामानातील बदल मानवी आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम करत आहे याबाबत लोकांना माहिती देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी कंपनीने गुगल सर्चवर लेटेस्ट एअर क्वॉलिटी इन्फर्मेशन आणण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर करार केला आहे. त्यामुळे आता नागरिक जवळच्या केंद्रावरुन Air quality near me किंवा Air quality delhi सारखे प्रश्न विचारुन हवा गुणवत्तेबाबत माहिती मिळवू शकतात.

Advertisement

गुगलने हवामानबाबत माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विज्ञान विभागा बरोबर करार केला आहे. त्यामुळे लोकांना आता हवामानाबाबत माहिती अत्यंत कमी वेळेत मिळणार आहे. ज्यावेळेस हवामान खराब असेल त्यावेळी हवामान विभागाद्वारे पाठवण्यात आलेला संदेश मोबाइल स्क्रीनसह गुगल सर्चमध्ये दिसेल.

Advertisement

भन्नाटच आहे की…! आता गुगल देणार ‘त्या’ महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर; पहा, पर्यावरणाचा ‘कसा’ होणार फायदा..?

Advertisement

अर्र… म्हणून ‘त्या’ लाखो स्मार्टफोन्सना बसणार झटका; पहा, गुगलने घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply