Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारला इतक्यात दिलासा नाहीच..! कृषी कायद्यांवर सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा ‘असा’ आहे प्लान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर आता देशातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस तर या मुद्द्यावर आधिक आक्रमक आहे. काँग्रेसचे नेते मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे लवकरच सुरू होणाऱ्या संसदेच्या आधिवेशनातही सरकारला घेरण्याची रणनिती असल्याचे समजते.

Advertisement

केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले, की ‘इतक्या दिवसांपासून कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय आहे. या दरम्यान 700 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आता वाटते की केंद्र सरकार दोषी आहे.. मात्र, शेतकऱ्यांनी आतापर्यंत जो त्रास सहन केला त्याची जबाबदारी कोण घेणार ? आम्ही हे मुद्दे संसदेत उपस्थित करणार आहोत.’ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही केंद्र सरकावर जोरदार टीका केली.

Advertisement

सरकारने 17 सप्टेंबर 2020 रोजी हे कायदे आणले होते. मात्र, त्यानंतर शेतकरी संघटनांनी या कायद्यांना सातत्याने विरोध केला. सरकारने हे कायदे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली जात होती. सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे बराच काळ आंदोलन सुरू होते. आंदोलक आणि केंद्र सरकार दरम्यान अनेक वेळा चर्चा झाली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार संघटनांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज अखेर केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर आता देशातील विरोधी पक्ष केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. उत्तर प्रदेश आणि काही राज्यात निवडणुका होणार असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचाही आरोप केला जात आहे. तसेच आता काँग्रेसने काही महत्वाचे प्रश्न विचारले असून संसद आधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता आधिवेशनात काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

शेतकरी आंदोलकाचा झाला विजय..! अखेर कृषी कायदे केंद्राने घेतले मागे..!

Advertisement

कृषी कायद्यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलीय प्रतिक्रिया; केंद्र सरकारला सांगितलेय ‘असे’ काही…

Advertisement
Advertisement

Leave a Reply