Take a fresh look at your lifestyle.

कृषी कायद्यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलीय प्रतिक्रिया; केंद्र सरकारला सांगितलेय ‘असे’ काही…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून काही शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. देशच्या राजधानीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले. केंद्र सरकारनेही अनेक वेळा शेतकरी संघटनांबरोबर चर्चा केली. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही.

Advertisement

केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ट्विट केले, की कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे.

Advertisement

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, असे त्यांनी सांगितले. केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवा. म्हणजे आज जी नामुष्की आली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

Advertisement

दरम्यान, याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या आधिवेशनात आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरीबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता. पण इतकी पवित्र, निव्वळ शुद्ध, शेतकऱ्यांच्या हिताची बाब आम्ही प्रयत्न करुनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही कृषी कायद्यांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आहे ‘अशी’; कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावर पहा काय टोमणा मारलाय मोदींना..!

Advertisement

राहुल गांधींनी दिलीय पहिली प्रतिक्रिया; पहा मोदींबद्दल काय म्हटलेय त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply