Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..आता ‘या’ देशात कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात सापडलेत इतके कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भारतात आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र, जगात अजूनही असे काही देश आहेत जेथे कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. विशेष म्हणजे, हे देश अतिशय विकसित आहेत. येथे आरोग्य यंत्रणाही अत्यंत दर्जेदार आहे. तरीसुद्धा या देशांना कोरोना आटोक्यात आणता आलेला नाही. सध्या युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. आज तर जर्मनीमध्ये कोरोनाने मागील सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.

Advertisement

जर्मनीच्या रोग आणि नियंत्रण केंद्राने गेल्या 24 तासात तब्बल 65 हजार 371 नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. या देशात सध्या प्रति एक लाख लोकसंख्येत 340 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात ही संख्या 249 इतकी होती. फक्त सात दिवसात यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

या देशात कोरोना वाढण्यामागे कारणही तसेच खास आहे. पश्चिम युरोपमधील देशांत जर्मनी हा अस देश आहे जेथे सर्वात कमी लसीकरण झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या फक्त 67 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. अद्याप 33 टक्के लोकांनी लसीकरण केलेले नाही. कोरोना संसर्ग वेगाने वाढण्यामागे हे एक मोठे कारण आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

दरम्यान, युरोपातील ब्रिटेन, फ्रान्स या देशांतही कोरोना वेगाने वाढत चालला आहे. या व्यतिरिक्त रशिया, चीन, अमेरिका या देशांत सुद्धा परिस्थिती खराब होत आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखे कठोर उपाय राबवण्यात येत आहेत. तरी देखील हा आजार नियंत्रणात आलेला नाही. दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या देशांचे टेन्शन वाढले आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारच्या या आवाहनास त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. या देशांच्या सरकारच्याही हे लक्षात आल्याने आता काही नवे निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement

कोरोनानंतर उत्तर प्रदेशात ‘या’ आजाराचे थैमान; रुग्णसंख्येने मोडले 8 वर्षांचे रेकॉर्ड; पहा, काय आहे परिस्थिती

Advertisement

.. अन् तरीही ‘त्या’ देशांना कोरोना रोखता येईना; पहा, युरोपीय देशांत कशामुळे वाढतोय कोरोना

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply