Take a fresh look at your lifestyle.

वाव.. जगातील ‘त्या’ शहरांनी ‘असे’ केलेय प्रदूषण कंट्रोल; जाणून घ्या, कोणते निर्णय ठरले फायद्याचे..?

नवी दिल्ली : वायू प्रदूषणाची समस्या फक्त भारतात नाही तर अवघ्या जगासाठीच त्रासदायक ठरत आहे. जगात अनेक देशांत वायू प्रदूषण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. या संकटामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या भारतातील काही शहरात या समस्येने विक्राळ रुप धारण केले आहे. राजधानी दिल्ली शहरात तर हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. वाढते प्रदूषण पाहता शाळा बंद करणे तसेच वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

दिल्ली प्रमाणेच जगातील अनेक शहरे या संकटाचा सामना करत आहेत. या देशांनीही प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेतले असून तितक्याच कठोरपणे या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली आहे. चला तर मग, आपणही जाणून घेऊ या की या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी कोणते निर्णय घेण्यात आले.

Advertisement

फ्रान्सच्या राजधानीचे शहर असणाऱ्या पॅरीसमध्ये वायू प्रदूषण बेसुमार वाढले होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी विकेंडमध्ये कार चालवण्यास मनाई करण्यात आली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस सवलत देण्यात आली होती.

Advertisement

ओस्लो या शहरात नो कार जोन तयार करण्यावर विचार सुरू आहे. यामध्ये फक्त मोटार सायकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार केले जातील. तसेच भविष्यात लोक वाहनांचा वापर कमी करतील यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement

हेलसिन्की शहरातही वाहनांचा वापर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. प्रदूषण कमी करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जास्त शुल्क आकारणे, मोटार सायकलच्या वापरात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शहरामध्ये लोकांना पायी चालता यावे, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे असे निर्णय प्रशासनाने घेतले.

Advertisement

ब्राजील देशातील क्यूरिटिबा या शहरात बस वाहतूक व्यवस्थेस आधिक मजबूत केले गेले. त्यामुळे लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. लोकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करावा, हा उद्देश या निर्णयामागे होता. आता या शहरात तब्बल 70 टक्के लोक सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करतात. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहे.

Advertisement

बाब्बो.. म्हणून जनजीवन झालेय ठप्प..! पहा नेमके काय चाललेय दिल्ली आणि उत्तर भारतात

Advertisement

प्रदूषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकार करणार ‘असा’ प्लान; पहा, काय नियोजन आहे सरकारचे

Advertisement
Advertisement

Leave a Reply