Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रावसाहेब दानवे यांनी केली महत्वाची घोषणा, वाचा तर खरं..

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात रेल्वेच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्याचा विचार नाही. तसेच प्रवाशांना 999 रुपयांत एसी पॉडमध्ये राहण्याचीही सोय करणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

Advertisement

ते म्हणाले, की भविष्यात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्याचा कोणताही विचार नाही. उलट एसी पॉडमध्ये राहण्याची सुविधा करणार आहोत. अवघ्या 999 रुपयांत प्रवाशांना त्यात राहता येईल. तसेच रेल्वेत स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे.

Advertisement

रेल्वे प्रवाशांचा चांगला प्रवास व्हावा, यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. चांगली सुविधा देत असतानाच त्याचा भार प्रवाशांच्या खिशावर पडणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Advertisement

देशात 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर रेल्वेत अनेक नवनवीन कल्पना राबविण्यात आल्या आहेत. मुंबईत दररोज 70 लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांचा प्रवास सोपा कसा होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. 1 हजार रुपयात आम्ही मुंबई सेंटरला राहण्याची सोय केली. 130 कोटी रुपयांच्या नवीन सुविधा दिल्या आहेत. भविष्यात आणखी काही योजना सुरू करणार आहोत. त्यात उत्तर भारतातील काही राज्ये जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

इंधन दरवाढीबाबत अजब विधान
दरम्यान, देशातील इंधन दरवाढीबाबत केलेल्या विधानावरुन काही दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात. केंद्र सरकार या किंमती वाढवत नाही. त्यामुळे दरवाढीवरुन आमच्यावर आरोप करणे चुकी असल्याचे अजब स्पष्टीकरण दानवे यांनी दिले होते.

Advertisement

सोन्याला झळाळी, चांदीच्या भावात घसरण, सराफ बाजारातील परिस्थिती जाणून घ्या..!
एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासांचा अल्टीमेटम, एसटी महामंडळाने काय इशारा दिलाय, वाचा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply