Take a fresh look at your lifestyle.

कोरोनानंतर उत्तर प्रदेशात ‘या’ आजाराचे थैमान; रुग्णसंख्येने मोडले 8 वर्षांचे रेकॉर्ड; पहा, काय आहे परिस्थिती

लखनऊ : देशभरात कोरोना आता कुठे नियंत्रणात येत असतानाच उत्तर भारतात नव्या आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हा आजार तसा नवा नाही मात्र कोरोना पाठोपाठ हा आजार सुद्धा चांगलाच तापदायक ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उत्तर प्रदेश राज्यात डेंग्यूने प्रचंड थैमान घातले असून मागील आठ वर्षांतील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. कोरोना नियंत्रणात येत असला तरी अद्याप धोका कायम आहे. त्यात आता डेंग्यूने त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोरील आव्हाने वाढली आहेत.

Advertisement

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत डेंग्यूचे 25 हजार 800 रुग्ण सापडले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या आठ पट जास्त आहे. सर्वाधिक 5 हजार 700 रुग्ण फिरोजाबाद जिल्ह्यात आढळले आहेत. राजधानी लखनऊ शहक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आजारामुळे होणारे मृत्यू मात्र कमी आहेत. तसेच दवाखान्यातही कुठे गर्दी नाही, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत. सरकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डेंग्यूमुळे आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

या वर्षात लखनऊमध्ये डेंग्यूचे 1 हजार 936 रुग्ण आढळले आहेत. याआधी 2019 मध्ये 885 आणि 2020 मध्ये 635 रुग्ण आढळले होते. सरकारी दवाखान्यांच्या तुलनेत खासगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त मेरठ, आग्रा, बरेली, प्रयागराज या शहरांमध्ये सुद्धा डेंग्यूचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, सध्या डेंग्यूचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत.

Advertisement

म्हणून डेंग्यूचा डास आहे भयंकर; पहा लक्षणे आणि बचावाबद्दल महत्वाची माहिती

Advertisement

अर्र… पाकिस्तानच्या एका शहरात `गूढ तापा`चे थैमान… जाणून घ्या काय म्हणाले तज्ञ

Advertisement
Advertisement

Leave a Reply