Take a fresh look at your lifestyle.

.. अन् तरीही ‘त्या’ देशांना कोरोना रोखता येईना; पहा, युरोपीय देशांत कशामुळे वाढतोय कोरोना

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले होते. या काळात रुग्णालयांना ऑक्सिजनची प्रचंड कमतरता जाणवत होती. आता अशीच भीषण परिस्थिती रशिया या देशात निर्माण झाली आहे. रशियात सध्या कोरोनाने हाहाकार उडाला आहे. येथे अद्याप कोरोना नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून काही रुग्णालयांमध्ये फक्त 12 दिवसांचाच ऑक्सिजन साठा शिल्लक राहिला आहे, अशी माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली.

Advertisement

जर्मनीमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. युरोपमध्ये कोरोना महामारीच्या धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले नाही त्यांना पुढील वर्षात 1 एप्रिलपासून लसीकरण बंधनकारक राहणार असल्याचे ब्रिटेन सरकारने म्हटले आहे. सध्या रशिया, जर्मनी, ब्रिटेन, स्पेन, फ्रान्स या युरोपीय देशात कोरोना वेगाने वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, हे सर्वच देश विकसित आहेत. या देशांची लोकसंख्याही फार कमी आहे. आरोग्य यंत्रणा अत्यंत दर्जेदार आहे. तरी सुद्धा या देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. मागील काही दिवसांपासून या देशांमध्ये कोरोना वेगाने फैलावत चालला आहे.

Advertisement

या देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सरकारने वारंवार आवाहन केल्यानंतरही लसीकरण मोहिमेस अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्यामुळे येथे कोरोना संसर्ग वाढत चालल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

दरम्यान, भारतात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र जगातील काही देश अजूनही या संकटातून बाहेर आलेले नाहीत. रशिया, चीन, लाटव्हिया तसेच युरोपातील अन्य काही देशात कोरोना पुन्हा वेगाने फैलावत चालला आहे. या देशात परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण फारसे नाही. त्याचा परिणाम म्हणून येथे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांनी लसीकरण करण्याचे आवाहन सरकार वारंवार करत आहे. मात्र, त्याचा फारसा फरक पडताना दिसत नाही.

Advertisement

धक्कादायक..! ‘या’ देशात कोरोनाचा विस्फोट; पाचवी लाट ठरतेय अत्यंत घातक; पहा, काय आहे परिस्थिती

Advertisement

अरे बापरे.. म्हणून ‘त्या’ देशांत कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; WHO ने दिलाय ‘हा’ गंभीर इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply