Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. एकाच महिन्यात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; पहा, दरवाढीचा काय होतोय परिणाम

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोल आता 120 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. इंधनाचे भाव इतक्या वेगाने वाढत चालले आहेत. मागील एक महिन्याचा विचार केला तर या महिन्यात पेट्रोलच्या दरात 6.90 रुपये तर डिझेलचे दर 7.45 रुपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याचे कारण देत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे.

Advertisement

एका महिन्याआधी म्हणजे, 28 सप्टेंबर रोजी लखनऊ शहरात पेट्रोल 98.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.98 रुपये प्रति लिटर या दराने मिळत होते. त्यानंतर आज 28 ऑक्टोबर रोजी पेट्रोल 105.22 रुपये आणि डिझेल 97.48 रुपये दराने मिळत आहे. अन्य शहरांतही अशीच परिस्थिती आहे. सध्या इंधनाचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. ऑक्टोबर महिन्यातील 28 दिवसांपैकी 21 दिवस इंधन दरवाढ केली आहे. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 6.65 रुपये तर डिझेल 7.25 रुपयांनी वाढले आहे.

Advertisement

इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम अन्य घटकांवर होत आहे. त्यामुळे येथेही दरवाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच नागरिक हैराण आहेत. उत्पन्न घटले आहे. त्यामुळे घरखर्च कसा करायचा, असा मोठा प्रश्न आहे. मात्र, या कशाचाही विचार सरकारने केलेला नाही.

Advertisement

इंधनावरील कराच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न सरकार मिळवत आहे. हा कर कमी करण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेला नाही. तसेच दर कमी करण्यास तेल कंपन्याही तयार नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसात इंधनाचे दर कमी होतील याचीही शक्यता दिसत नाही.

Advertisement

.. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होतील कमी; मोदी सरकार ‘तो’ निर्णय घेण्याची शक्यता

Advertisement

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका : कोणत्या शहरात मिळतेय देशभरातील सर्वात महाग पेट्रोल

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply