Take a fresh look at your lifestyle.

टी-20 विश्वचषक : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियात बदल.. या दोघांना मिळणार डच्चू

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषकात भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. विराट कोहलीचा संघ भारत विश्वचषकात शानदार सुरुवात करेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. 24 ऑक्टोबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला.

Advertisement

या पराभवानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही अशी चर्चा आहे. कारण भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडशी आहे. विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताचा किवीविरुद्धचा विक्रम फारसा चांगला नाही. न्यूझीलंड विरुद्धचा सामना भारत विरुद्ध करा किंवा मरो असा आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Advertisement

या महत्त्वाच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. भारतीय संघाचा सराव करतानाचे काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. त्या आधारावर असे म्हणता येईल की आगामी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर टीम इंडियाच्या सरावाची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोत सर्व खेळाडू चार जणांच्या गटात सराव करत आहेत. विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि वरुण चक्रवर्ती एका ग्रुपमध्ये दिसत आहेत.

Advertisement

शार्दुल ज्या पद्धतीने सराव करत आहे, ते पाहता तो न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे, असे म्हणता येईल. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. याशिवाय इशन किशनही सराव करताना दिसत आहे.

Advertisement

अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या हे दोघे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात  लयीत दिसले नाहीत. भुवीने चार षटकांच्या स्पेलमध्ये 54 धावा दिल्या. याशिवाय हार्दिकही फलंदाजीदरम्यान संघर्ष करताना दिसला. तो 8 चेंडूत केवळ 11 धावा करू शकला.

Advertisement

दोन्ही खेळाडूंची ही कामगिरी पाहता त्यांना वगळले जाऊ शकते. त्याचवेळी इशन किशनने सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. इशान व्यतिरिक्त ज्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे त्यात शार्दुल ठाकूर आणि आर अश्विन यांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply