Take a fresh look at your lifestyle.

यंदा ‘टी 20’ मध्ये घडतोय अजब योगायोग; ‘त्या’ संघांच्या यशात ‘हा’ फॅक्टर ठरतोय कारणीभूत

दुबई : आयपीएल नंतर आता टी 20 विश्वचषक सुरू आहे. युएई आणि ओमान या देशात सामने होत आहेत. या स्पर्धेत यंदा काही अजब योगायोग घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. ज्या संघांचा कुणी विचारही केला नसेल असे संघ यंदा दमदार कामगिरी करत आहेत. नामिबिया सारख्या अगदीच नवख्या संघाने गुणतालिकेत भारतालाही मागे टाकले आहे. या संघाने कालच्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, जो संघ नाणेफेक जिंकत आहे, तोच संघ सामना सुद्धा जिंकत आहे, असे दिसून येत आहे.

Advertisement

बुधवारपर्यंत सुपर 12 फेरीत 9 सामने झाले आहेत. या 9 सामन्यात नाणेफेक जिंकणारे आठ संघ विजयी झाले आहेत. यामध्ये फक्त बांग्लादेशचा अपवाद राहिला आहे. या संघाने नाणेफेक जिंकली होती मात्र, प्रत्यक्ष सामन्यात पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेणारे संघ यशस्वी होत आहेत. यामागे कारणही तसेच खास आहे.

Advertisement

युएईमध्ये सामने होत आहेत. येथील तापमान 25 डिग्री ते 30 डिग्रीपर्यंत आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस येथील मैदानात ओलावा निर्माण होतो. या कारणामुळे गोलंदाजी करताना गोलंदाजांना करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बहुतेक संघ घेत आहेत. सध्याच्या घडीस हा मुद्दा क्रिकेट संघांना चांगलाच त्रासदायक ठरत आहे. काही संघांच्या कर्णधारांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

Advertisement

टी-20 विश्वचषक : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर का चिडला विराट.. जाणून घ्या काय घडले

Advertisement

टी -20 विश्वचषक : भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भलतच बोलून बसला हेडन.. कोणाशी केली तुलना

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply