Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ ठिकाणी मिळू शकेल एलपीजी गॅस; पहा, काय आहे केंद्र सरकारचा विचार..?

नवी दिल्ली : राज्य आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी काही योजना सुरू करतात. तर आधीच्याच काही योजनांमध्ये बदल केला जातो. सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारी योजनांमध्ये सुधारणा केल्या जातात. आताही सरकारने घरगुती गॅस वितरण पद्धतीत आधिक सुधारणा करण्याचा विचार सुरू केला आहे. तुम्ही घरामध्ये जर लहान एलपीजी गॅस टाकी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, सरकार आता देशातील रेशन दुकानांच्या माध्यमातून लहान एलपीजी गॅस सिलिंडर विक्री करण्याचा विचार करत आहे.

Advertisement

एका मीडिया अहवालाच्या मते, रेशनची दुकानं आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहारिक बनवण्यासाठी अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी अलीकडेच विविध राज्यातील अधिकाऱ्यांसह व्हर्च्युअल बैठक केली होती, त्या दरम्यान हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक अँड आयटी, अर्थ आणि पेट्रोलियम अँड नॅच्युरल गॅस मंत्रालय, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेज इंडिया लिमिटेडचे अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते.

Advertisement

सरकारने जर हा निर्णय घेतला तर सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कमी होईल. नागरिकांना गॅस टाकी सहज उपलब्ध होईल. ऑईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही सरकारच्या या प्रस्तावाचे कौतुक केले. या प्रस्तावावर कार्यवाही इच्छुक असणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक सहकार्य केले जाईल, असे या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. सरकारने या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतला आहे किंवा नाही, याबाबत आधिकृत माहिती नाही. मात्र, सरकारने जर हा निर्णय घेतला तर सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कमी होईल तसेच रेशन दुकानांचे उत्पन्नात वाढ होईल.

Advertisement

पॅनकार्ड, पासपोर्टसाठी अर्ज करायचाय..? मग, रेशन दुकान आहे ना; पहा, रेशन दुकानांबाबत सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement

तुम्हाला माहितेय का गॅस सिलिंडरचीही असते एक्सपायरी डेट? तर जाणून घ्या कसे पहायचे..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply