Take a fresh look at your lifestyle.

Blog | प्रकाश झा.. आश्रम.. इर्शाद.. खरे.. अन नंतर तुम्हीही..

‘इर्शाद’ या गीतमैफिलीचा नावबदल.. आणि आश्रम या सुपरहिट वेबसिरीजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावरील शाइफेक.. ही साधी प्रकरणे नाहीत.. खरेंनी याप्रकरणी व्यावहारिक शहाणपण दाखवून दिवाळी पहाट दणक्यात केलीय.. पण प्रकाश झा काही त्यातले नाहीत.. ते लढणारे अन भिडणारे आहेत.. पण तुमचाही नंबर कधी ना कधी लागणार आहे.. कारण भावना दुखण्याचा खेळ आता फोफावला आहे..

Advertisement

आम्ही पिक्चरवाला नावाने युट्युब चॅनेल चालवतो. त्यात गावठी पोट्टे आणि सोसायटीच्या राजकारणाची धमाल आम्ही चित्रित केलीय. तांत्रिकदृष्ट्या आम्ही काही बेस्ट काम केलंय असेही नाही. आम्ही हौशी आहोत. पण त्यातल्या सोसायटीच्या जिल्हा बँक निवडणूक ठरावाच्या निमित्ताने चित्रित केलेले अनेकांना खुपले आहे. माझ्याच गावात चित्रित होणारी आमची वेबसिरीज बंद पडण्याचा खेळही काहींनी करून पाहिला आहे. म्हणजे असे सत्य समोर आणल्यास त्रास देण्याचे प्रकार फक्त बातम्यातून तुम्हाला दिसतील असे नाही. ते थेट तुम्हाला लक्ष्य करू शकतात.

Advertisement

मी ना खरेंच्या पठडीतला.. ना प्रकाश झा यांच्या.. मी यातलाही सोयीस्करवादी. पण मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही “या मुद्द्यावर” काहीही लिहिले किंवा ऑडिओ-व्हिडीओ यांच्या माध्यमातून दाखवले तर आम्ही “याव-त्याव” करू म्हणणारी कावकाव आता थेट गावोगावी फोफावत आहे.

Advertisement

आश्रम ही सिरीज किंवा आमचे गावठी पोट्टे यामधील सोसायटीचे गलिच्छ राजकारण हे वास्तव नाही का? नसेल तर मग असा कंटेंट दाखवणे निश्चित चूक आहे. पण जर त्यात दाखवले जाणारे सत्य असेल तर मग काय हरकत असावी कोणाची? आणि काहींना पोटशूळ उठत असेल आणि मग इतर धर्मातील अंधश्रद्धा व चालीरीती यावर का आम्ही असे करीत नाहीत असे म्हणणे असल्यास तुमच्या विचारांच्या दिग्दर्शक व निर्माता यांनी त्याही वास्तववादी गोष्टी लिहाव्यात की. आम्हीही असा कंटेंट नक्कीच पाहू. किंवा तुम्हाला शक्य नसेल तर बजेट द्या की आम्हाला आम्हीही असले वास्तव आणू की जगासमोर..

Advertisement

https://youtu.be/lp1MlSXulUQ

Advertisement

लेखक, कवी, दिग्दर्शक, निर्माते आणि वास्तववादी कंटेंट वाचायला, पाहायला किंवा ऐकायला आवडणाऱ्या सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कोणीतरी मिसाळू आपल्याला काय पाहावे आणि काय पाहू नये हे सांगत आहेत. मग बजरंग दल नावाची संघटना प्रकाश झा यांच्या आश्रम 3 याच्या सेटवर जाऊन गोंधळ करीत आहे. खरे नाव बदलून धंदा करीत आहेत. आणि आपण हे सगळे पाहूनही शांत आहोत..!

Advertisement

लेखक आनंद यादव यांचा किस्सा आपण सगळेच विसरलोय. कलबुर्गी यांची घटनाही आपण विसरलोय. आणि आता खरे व झा यांच्याबाबत घडलेला प्रसंगही तुम्ही विसरून जाणार. पण यामुळे नवीन दर्जेदार साहित्य आणि कंटेंट निर्माण होण्यात येणाऱ्या अडचणी आपण लक्षात घेताय का? हुकूमशाही हा याच्या पुढचा अध्याय आहे. आता सुरू असलेला धार्मिक फॅसिस्ट मंडळींचा नंगानाच हाच खरा मुद्दा आहे. फ्रान्समध्ये इस्लामिक माथेफिरूंनी फक्त कार्टून काढले म्हणून एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात रक्तरंजित खेळ केला होता. आपल्याकडे असे धार्मिक खेळ फोफावत आहेत. अगोदर असा मूर्खपणा काही इस्लामिक माथेफिरू करीत होते. आता नव्या भारतात हिंदुत्ववादी माथेफिरूंनी त्यात भर टाकली आहे. तुमचा त्यांना नसेलही पाठिंबा पण जर त्याला विरोध नसेल करायचा तर मस्तपैकी फक्त कार्टून पहा..

Advertisement

लेखक : सचिन मोहन चोभे (संचालक, पिक्चरवाला)

Advertisement
Advertisement

Leave a Reply