Take a fresh look at your lifestyle.

योगासह आयुर्वेद अभ्याससुद्धा महत्वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अहमदनगर : मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ज्या प्रकारे योगाभ्यास महत्त्वाचा आहे. तसाच आयुर्वेद अभ्याससुद्धा महत्वाचा आहे. आयुर्वेद आपले आहे आणि भारताचे ते वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. त्यातच मोठे काम आता प्रवरा परिवार करणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Advertisement

प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनिताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट्च्या विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत इनामदार आदी उपस्थित होते.

Advertisement

कोश्यारी पुढे म्हणाले की, उपचारासाठी अलोपॅथीचे जसे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद व योगा महत्त्वाचा आहे. आयुर्वेद हा सर्वात जूना वेद आहे. आज आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. तरीसुद्धा आज आपण आपल्या परंपरेत असलेल्या आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहीतेमध्ये ‘गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा’ ही जीवनशैली नमूद केली आहे.

Advertisement

पुढे राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, आयुर्वेदाचे महत्त्व ओळखत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र ‘आयुष्य मंत्रालय’ स्थापन केले आहे. स्वस्त किंमतीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात ‘जन औषधी केंद्र’ स्थापन झालेले आहेत. योगाचा प्रचार-प्रसारांवर त्यांचा भर राहिलेला आहे. २१ जून हा योग दिन म्हणून आपण देशभर साजरा करत आहोत.
‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ने सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे‌.

Advertisement

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रवरेने आपल्या कामातून देशात नावलौकिक मिळवला आहे. आयुर्वेदासाठी नरेंद्र मोदी सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांनी विविध आयुर्वेद वनस्पतींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होईल. करोना महामारीत आयुष मंत्रालयाने महत्वाचे योगदान दिले. डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. व्ही. एन. मगरे यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply