Take a fresh look at your lifestyle.

Blog | अफू.. गांजा.. संस्कृती.. अन् अर्थकारण…!

सध्या चर्चेत असलेले अमली पदार्थ जणू काही विष आहेत अशा अविर्भावात सरकारे व माध्यमे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राबवत आपण जनहिताचे काम करीत आहोत अशा थाटात वावरताहेत. वस्तुस्थिती पहाता हे सारे पदार्थ एवढ्या प्रयत्नांनंतरही कुठेही मिळू शकतात एवढे मानवी संस्कृतीशी जुळलेले आहेत.

Advertisement

लेखक : गिरधर पाटील (शेती विषयाचे अभ्यासक, नाशिक)

Advertisement

फार लांब न जाता काही प्रदेशात भारतासह लहान बाळांना झोप यावी म्हणून आया आपल्या बाळाला झोपवण्यासाठी अफूचा वापर करीत. वैद्यकिय शास्त्र विकसित होताच हा वापर कमी झाला असला तरी कुठल्याही तीर्थस्थानी हे पदार्थ सहजगत्या मिळू शकतात. त्यांचा अध्यात्म व समाधी लावण्याचा संबंध असल्याने त्यांच्या विरोधात फारसे बोलले जात नाही. या साऱ्या कारवाईचा सरकारचा रोख आपला महसूल वाढवण्यासाठी कसा कसा होत गेला याचा सुरेख इतिहास पुलित्झर पारितोषिक विजेता अमेरिकन पत्रकार विल्यम डफ्ती याने आपल्या शुगर ब्लूज या पुस्तकात केला आहे. साखरेसह अमली पदार्थांचा उगम व त्यांचे सरकारातील स्थान केवळ सरकारी महसूलाशी जोडत या प्रश्नाकडे पहाण्याचा नवा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात प्रचंड महसूल देणारा दारूचा धंदा अगोदर मुक्त करण्यात आला. राज्यात गुटका बंदी असतांना सर्वदूर गुटका उपलब्ध होऊ शकतो. साखरेचा व इतर स्फटिकमय अमली पदार्थांचा उगम, प्रक्रिया, प्रसार व वापर हा सारखाच असल्याचे दिसते.

Advertisement

मडक्यात ठेवलेल्या उसाच्या रसाला कालांतराने स्फटिक स्वरुप येत असल्याने तिला खंडी म्हटले जाई. पुढे युरापात त्याला कँडी म्हणून संबोधत तिचा वापर एवढा वाढला की त्यावेळच्या अनेक सरकारांचा महसूल आज आपण जसे दारूच्या महसूलाकडे बघत आहोत तसाच होता. साखरेला अन्न म्हणत त्यावर भरमसाट कर लावण्याची पध्दत अजूनही मान्यतापात्र समजला जाते. एकाद्या वनस्पतीचा रस काढून त्यांचे स्फटिकीकरण करणे या अफू तयात करण्याच्या पध्दतीत व साखर तयार करण्याचा पध्दतीत कमालीचे साम्य आहे. इतर अमली पदार्थांच्या सेवनाने व्यसनाचे प्रमाण वाढत असले तरी साखरेमुळे होणाऱ्या मधुमेहावर, त्याच्या उपचारावर जागतिक अर्थशास्त्र , विशेषतः औषध उद्योगाचे अवलंबून आहे. एस मिनिस्टर या मालिकेत धुम्रपानामुळे फुफ्पुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने तंबाखू आयातीवर निर्बंध लादावेत असा प्रस्ताव आला असतांना हजारो कोटिं महसूल गमावण्याच्या भितीने आयात तशीच ठेवावी मात्र त्यापेकी काही शेकडा कोटी पौंड फुफ्फुसाच्या कर्करोगाची रुग्णालये काढण्यासाठी खर्च करावेत असा तोडगा काढण्यात आला.

Advertisement

आजही या पदार्थांवरचे निर्बंध हे जनहितासाठी नसून तंबाखू व सिग्रेट उद्योगाच्या दडपणामुळे आहेत. मधुमेहात साखर कमी करण्यासाठी इन्शुलिनचा शोध लावणाऱ्याला नोबल मिळते पण हायपोग्लायसिमिया अवस्थेत वरुन साखर दिल्यास रुग्ण बचावतो या शोधाकडे कुणी लक्ष दिले नाही कारण त्यात कुठल्याही आर्थिक उलाढालीची शक्यता शून्य होती. सर्व अमली पदार्थाच्या वापराची कारणे सारखी असली तरी त्यांची विगतवारी ही त्यातील अर्थकारणावर अवलंबून असते. राज्यात दारूबंदी खाते, दोन मंत्री व सातवा वेतन खाणारी महाकाय यंत्रणा असून महसूलात देखील अग्रगण्य असल्याने तिच्यावर म्हणावी तेवढी कारवाई होतांना दिसत नाही. शेवटी आवरण जनहिताचे असले तरी खरे कारण त्यामागचे अर्थकारण असते हे लक्षात घेतले पाहिजे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply