Take a fresh look at your lifestyle.

सोने खरेदीचा विचार करताय.. ? जाणून घ्या, आज काय आहेत सोन्याचे भाव; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज

मुंबई : देशात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे यंदा उत्साह जाणवत आहे. या दिवसात सोन्याला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. या काळात तुम्ही सुद्धा सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी सोन्याचे भाव काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव कमी जास्त होत आहेत. आज सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज मध्ये आज सोन्याचा भाव सुमारे 47,300 रुपये प्रति तोळा असा आहे. तर काल सोन्याचा दर प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचला होता.

Advertisement

कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी महागाई आणि मजबूत होणारा अमेरिकन डॉलर या कारणांमुळे पुढील महिन्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला 1720 डॉलर प्रति औंस भाव आहे. सोन्याचा भाव यापेक्षा कमी होणे कठीण असल्याचे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय अल्पावधीत सोन्याची किंमत 1800 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

आणखी एक महिन्यानंतर सोन्याचे दर 1850 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवरही होतो. त्यामुळे सध्याच्या 47,300 रुपये प्रति तोळाच्या किंमतीवर सोने खरेदी करू शकतात, असा गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. पुढील काळात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर वाढतील असा अंदाज आहे. पुढील महिन्यात 49 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत दर वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सोने-चांदीच्या दरात तेजी..! आज पुन्हा सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

Advertisement

सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply