Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार..! दिवाळीनंतर पुन्हा बसणार दरवाढीचा झटका; पहा, नेमकी कुठे होणार दरवाढ..?

मुंबई : सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका देणारी बातमी आली आहे. दिवाळीनंतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात भाव वाढण्याची शक्यता नाही. टीव्ही, फ्रीज, एसी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किंमती दिवाळीनंतर वाढू शकतात. काही दिवसांपासून तांबे, अॅल्यूमिनियम या धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्ऱॉनिक्स वस्तू तयार करणाऱ्या कंपन्या भाववाढीचा विचार करत आहेत. इंधन दरवाढ आणि सेमी कंडक्टरचा दुष्काळ या कारणांमुळेही भाववाढ करण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Advertisement

एबीपी न्युजने दिलेल्या वृत्तानुसार, सणासुदीच्या काळात कंपन्यांनी अधिक विक्रीमुळे दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत सात ते दहा टक्क्यांनी वाढ करू शकतात, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून धातूंच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

बहुतेक कंपन्या चीनमधून घटक आयात करतात आणि चीनमधून येणारे मालवाहतूक शुल्क पाच पटीने वाढले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी दरात वाढ केलेली नाही. आता मात्र कंपन्या तसा विचार करत आहेत. त्यामुळेच दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने दरवाढीची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. कंपन्यांनी जर हा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम नागरिकांवर होणार आहे. आधीच पेट्रोल- डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. त्याता आता या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती वाढल्या तर महागाईचा त्रास आणखी वाढणार आहे.

Advertisement

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! महागाई भत्त्यात केलीय इतकी वाढ; पहा, सरकारने काय घेतलाय निर्णय

Advertisement

अर्र.. आता टीव्ही सुद्धा देणार झटका..! ऐन महागाईच्या काळात होणार असे काही; नागरिकांचा त्रास वाढणार

Advertisement
Advertisement

Leave a Reply