Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून चीनने अमेरिकेला पुन्हा दिलीय धमकी; पहा, कोणत्या प्रकाराने चीनचा होतोय तिळपापड..?

नवी दिल्ली : तालिबानच्या मुद्द्यावर सध्या अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या विरोधात अमेरिका तैवानला समर्थन देत आहे. इतकेच नाही तर चीनने काही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देण्याचाही इशारा अमेरिकेने दिला होता. अमेरिकेने केलेल्या या प्रकारानंतर चीनही चांगलाच भडकला आहे. तैवानच्या मुद्द्यावर चीन कोणतीही तडजोड स्वीकार करणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

चीन अनेक वर्षांपासून तैवानवर हक्क सांगत आला आहे. तैवानचा प्रश्न हा चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा वेनबिन यांनी दिला आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की जर चीनने तैवानवर आक्रमण केले तर अमेरिका तैवानचे संरक्षण करेल. जगात पुन्हा एखादे शीत युद्ध व्हावे, असे अमेरिकेला वाटत नाही.

Advertisement

मात्र, सध्या चीन जे उद्योग करत आहे त्यामुळे धोका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत चीनकडून अनपेक्षित घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अमेरिका सुद्धा मागे हटणार नाही हे चीनच्या लक्षात आणून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर व्हाइट हाऊसकडून दिलेल्या आधिकृत निवेदनात म्हटले होते, की तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

सध्या अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातही हा तणाव कायम होता. त्यानंतर बायडेन यांच्या काळातही तणाव कमी होईल, असे वाटत नाही. तैवानच्या मुद्द्यावर तर दोन्ही देशात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तैवानवर कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. मात्र, तैवान सुरुवातीपासूनच जोरदार विरोध करत आहे. यासाठीच तैवानने स्वतःचे सैन्य सुद्धा तयार केले आहे.

Advertisement

अमेरिकेसह अन्य काही देशांचा तैवानला पाठिंबा आहे. मात्र, अमेरिका तर उघडपणे तैवानचे समर्थन करत आहे. त्यामुळे चीन चांगलाच हैराण झाला आहे. चीनच्या नेत्यांनी याआधीही अमेरिकेला धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता तर अमेरिकेनेही चीनला त्याच्यात भाषेत उत्तर दिल्याने चीन अस्वस्थ झाला आहे.

Advertisement

… म्हणून तैवानवर भडकलाय चीन; रागाच्या भरात ‘तिथे’ केलाय ‘असा’ कारनामा; पहा, नेमका काय आहे वाद..?

Advertisement

अर्र… ‘त्या’ युद्धात चीनने अमेरिकेचा केलाय पराभव; पहा, कुणी केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा; चीनचा कारनाम्याने अमेरिका हैराण

Advertisement
Advertisement

Leave a Reply