Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोन होतोय स्लो..? ‘या’ सोप्या उपायांनी अडचणी करा दूर; पहा, काय आहेत स्मार्ट टिप्स

अहमदनगर : आजचा जमाना स्मार्टफोनचा आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्या सुद्धा अत्याधुनिक आणि जास्तीत जास्त फीचर्स असणारे फोन आणत असतात. यामध्ये जास्त स्टोरेज असणाऱ्या फोनचा मोठ्या संख्येने समावेश असतो. कारण, सध्या जास्त स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनना मागणी वाढली आहे. असे असले तरी फोनमधील स्टोरेज क्षमता संपली की फोनचा स्पीड कमी होणे तसेच फोन नेहमीच्या पद्धतीने कार्य करत नाही. त्यामुळे अडचणी वाढतात. अशा परिस्थितीत, फोनच्या स्पीडवर परिणाम होतो. काही सोप्या उपायांनी या अडचणी कमी करता येतील.

Advertisement

बऱ्याचदा फोनमध्ये आपण सॉफ्टवेअर अपडेट करत नाहीत. कंपनीकडून अपडेशन संदर्भात सूचना दिल्या जातात. मात्र, सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करण्याकडे दुर्लक्ष होते. या कारणामुळे सुद्धा फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे ज्यावेळी कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेटचा मेसेज येईल त्यावेळी सॉफ्टवेअर अपडेट करायला हवे.

Advertisement

जर तुम्ही तुमच्या फोनवर लाईव्ह वॉलपेपर इंस्टॉल केले असेल तर फोनच्या प्रोसेसरला जास्त काम करावे लागते. यामुळे फोनची बॅटरीही पटकन संपते. तसेच, बिझी प्रोसेसरमुळे फोनचा वेगही कमी होतो. अशा परिस्थितीत फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर शक्यतो टाळावेत.

Advertisement

 फोनची मेमरी भरली की फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे फोनचा स्पीड कायम ठेवण्यासाठी फोनमधील मेमरी वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. या काही उपायांनी आपण आपल्या फोनच्या कार्यक्षमतेत वाढ करू शकतो.

Advertisement

आली रे आली.. आता चिनी स्मार्टफोनची बारी आली.., मोदी सरकारने घेतलाय हा मोठा निर्णय..!

Advertisement

फिकर नॉट.. मोबाईल पावसात भिजून खराब होण्याची भीती असेल तर वाचा की ‘ही’ माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply