Take a fresh look at your lifestyle.

भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराटचे महत्वाचे विधान; पहा, ‘त्या’ मुद्द्यावर नेमके काय म्हटलेय..

दुबई : आयपीएलनंतर टी 20 विश्वकप स्पर्धेस सुरुवात झाली आहे. यंदा युएई आणि ओमान या देशात सामने होत आहेत. या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयने केले आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधी भारताच्या संघाची घोषणा होऊ शकते, असा अंदाज आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने महत्वाचे विधान केले आहे.

Advertisement

विराट म्हणाला, की या सामन्यासाठी भारतीय संघ तयार आहे. संघाची घोषणा इतक्यात होणार नाही. सामन्याच्या काही वेळ आधी संघाची घोषणा होऊ शकते. हार्दिक पांड्याबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना विराट म्हणाला, की हार्दिक अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. हार्दिक संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. तरी सुद्धा आम्ही अन्य पर्यायांचा विचार केला आहे. पाकिस्तान विरोधातील सामन्यात कोणते खेळाडू संघात असतील याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र, या सामन्यासाठी आमचा संघ संतुलित असेल.

Advertisement

सामना कोणताही असो त्यासाठी योग्य नियोजन आणि तयारी करण्यावर आमचा भर असतो. संघाच्या गोलंदाजीवर पूर्ण विश्वास आहे. तसेच संघाचा प्रत्येक सदस्य त्याची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे. पाकिस्तान विरोधात एकही सामना भारताने गमावलेला नाही.

Advertisement

या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, की आम्ही कधी रेकॉर्डवर चर्चा करत नाही. याआधी संघाने काय कामगिरी केली याचा विचार सहसा करत नाही. कारण, यामुळे लक्ष विचलित होण्याची जास्त शक्यता असते. मात्र, भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली त्यामुळेच तर प्रत्येक वेळी यश मिळवता आले.

Advertisement

टी 20 विश्वचषक: टीम इंडियाचे ट्रम्प कार्ड ठरेल `हा` मिस्ट्री स्पिनर.. कोण आहे तो खेळाडू

Advertisement

टी 20 विश्वचषक : सलग सात विश्वचषक खेळणारा पहिला भारतीय ठरेल `हा`खेळाडू

Advertisement
Advertisement

Leave a Reply