Take a fresh look at your lifestyle.

यंदा दिवाळीत राहणार स्मार्टफोनची क्रेझ..! पहा, स्मार्टफोनबाबत काय म्हणतोय ‘तो’ अहवाल

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट आता बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहे. त्यामुळे यंदा सणसुदीच्या दिवसात उत्साह जाणवत आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारांनाही निर्बंधात आधिक सवलती दिल्या आहेत. परिणामी दैनंदीन घडामोडी वेगाने पूर्वपदावर येत आहेत. आता तर दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे. त्यामुळे लोक जोरदार खरेदी करत आहेत. त्यामुळे यंदा देशभरात तब्बल 58 हजार कोटी रुपयांचे स्मार्टफोनची विक्री होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

याआधी पाच वर्षांपूर्वी 27 हजार 700 रुपयांचे स्मार्टफोन विकले गेले होते. मागील वर्षात तर कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे सर्वकाही ठप्प होते. सण उत्सव सुद्धा साधेपणाने साजरे करण्यात आले. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचा प्रसार बराच कमी झाला आहे. देशातील 100 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले आहे. सरकारनेही निर्बंधांत आधिक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत खरेदी मोठ्या प्रमाणात होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Advertisement

काउंटरप्वाइंटने जारी केलेल्या अहवालानुसार, दिवाळीपर्यंत सणासुदीचा काळ सुरू राहणार आहे. या काळात देशभरात 58 हजार 400 कोटी रुपयांचे स्मार्टफोन विक्री होण्याचा अंदाज आहे. यावेळी मोबाइल क्षेत्रास सेमीकंडक्टरच्या टंचाईचे संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच काही महत्वाच्या घटकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरी सुद्धा बाजारात स्मार्टफोनसाठी मागणी वाढली आहे.

Advertisement

काउंटरप्वाइंटचे निर्देशक तरुण पाठक यांनी सांगितले, की मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्मार्टफोनच्या विक्रीत 14 टक्के वाढ झाली आहे. यावेळी अनेक वित्तीय संस्था नागरिकांना EMI सुविधा देत आहेत. त्यामुळे यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन खरेदी करत आहेत. यावर्षी स्मार्टफोन्सना मागणी जोरदार आहे. त्यामुळे यंदा देशात स्मार्टफोनची रेकॉर्ड ब्रेक विक्री होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

आली रे आली.. आता चिनी स्मार्टफोनची बारी आली.., मोदी सरकारने घेतलाय हा मोठा निर्णय..!

Advertisement

बाब्बो….! Google ही आता स्मार्टफोनच्या स्पर्धेत…आणणार अनोखे फिचर…वाचा…

Advertisement
Advertisement

Leave a Reply