Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ फक्त चीनमध्येच घडू शकते..! विमाने बंद, शाळाही केल्या बंद; पहा, कशामुळे घेतलाय ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : अवघ्या जगास कोरोनाच्या घातक संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये या आजाराने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. चीन प्रमाणेच रशिया, ब्रिटेन, लाटव्हिया, ब्राझील या काही देशांमध्ये अजूनही कोरोना थांबलेला नाही. रशियामध्ये तर परिस्थिती दिवसेंदिवस जास्त खराब होत चालली आहे. आता चीनमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. या देशातील काही प्रांतात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Advertisement

देशात येणाऱ्या पर्यटकांमार्फत चीनमध्ये काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

चीनने कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे. गर्दीची ठिकाणे, पर्यटन ठिकाणे, शाळा, मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन केला आहे. घराबाहेर पडायचे असल्यास कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विमानतळांवरून होणाऱ्या ६० टक्के विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगोलियातही निर्बंध लागू केले आहेत.

Advertisement

विशेष म्हणजे, चीनमध्ये 24 तासांमध्ये फक्त 13 करोनाबाधित आढळले. मात्र, तरीही चीन सरकारने संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. देशात शून्य करोना रुग्णांचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी एक जरी रुग्ण आढळला तरी अत्यंत कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advertisement

दरम्यान, युरोपातील काही देशात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण फारसे झालेले नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या देशांची लोकसंख्या कमी आहे. आरोग्य यंत्रणाही दर्जेदार आहेत. तरी देखील या देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येेत आहे.

Advertisement

आता ‘या’ देशात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; जाणून घ्या, कशामुळे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण

Advertisement

बापरे.. आता ‘या’ देशात कोरोनाचा विस्फोट; एक महिना राहणार कठोर लॉकडाऊन

Advertisement
Advertisement

Leave a Reply