Take a fresh look at your lifestyle.

आज सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

मुंबई : देशात काही दिवसांपासून पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. दरवाढीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला तर दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंमध्ये सोन्याच्या वायदे दरात प्रति दहा ग्रॅम 0.35 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. तर चांदीचे दरही 0.49 टक्क्यांनी वाढले.

Advertisement

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 47 हजार 568 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यात सोन्याने 56 हजार 200 रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यातुलनेत सोने अजूनही 8 हजार 632 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

Advertisement

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सोने-चांदीच्या दरात तेजी..! आज पुन्हा सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

Advertisement

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला; सोन्याचे दर वाढले, चांदीही चमकली; पहा, काय आहे आजचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply