Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तालिबानने भारताबाबत केलाय ‘तो’ खळबळजनक दावा; रशियानेही तालिबानला दिलाय गंभीर इशारा

मॉस्को : रशियामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत रशियाने तालिबानच्या प्रतिनिधींनाही सहभागी करुन घेतले आहे. भारत, चीन, पाकिस्तानसह अन्य दहा देश या बैठकीत सहभागी झाले आहे. अफगाणिस्तानच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत तालिबानने भारताबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. तालिबानने हा दावा केला असला तरी अद्याप भारताने यावर कोणतीही आधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने याबाबत एक ट्विट केले आहे. मॉस्को फॉर्मेट बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या जनतेला तातडीने मदतीची आवश्यकता असल्याचे म्हटले. अफगाणिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. भारत हा अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीने मदत करण्यास तयार आहे.

Advertisement

मॉस्को फॉर्मेट बैठकीमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तालिबानला इशारा दिला आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील निर्वासित नागरिकांच्या माध्यमातून दहशतवाद वाढू शकतो. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर शेजारील देशांविरोधात होऊ नये असेही तालिबानला रशियाने स्पष्टपणे सांगितले आहे.

Advertisement

वर्ष २०१७ पासून मॉस्को फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीन, भारत, इराण, पाकिस्तानसह १० देशांना निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीसाठी अमेरिकेलाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अमेरिकेने या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने का नकार दिला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, रशियाच्या पुढाकाराने ही बैठक होत असल्याने अमेरिकेने बाजूला राहणे पसंत केले, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिकेची जगभरात बदनामी होत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर अमेरिकेची कोंडी करण्यासाठी रशिया, चीन, पाकिस्तान प्रयत्न करत आहेत. यामध्ये रशियाने आघाडी घेतली आहे. मॉस्को बैठक आयोजित करण्यामागेही तसाच काहीसा उद्देश आहे. अफगाणिस्तान मध्ये आता अमेरिकेचा फारसा हस्तक्षेप राहिलेला नाही. त्यामुळे या देशाचे भवितव्य ठरवण्यात रशियासह चीन आणि पाकिस्तान या देशांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

कंगाल तालिबान..! विदेशातील अब्जावधी रुपये हडपण्याचा ‘असा’ केलाय प्लान; पहा, अमेरिकेचे काय आहे धोरण

Advertisement

तालिबान्यांना हुलकावणी देण्याचा ‘त्यांचा’ प्लान; अफगाणी लोकांना पैसे देण्यासाठी ‘असे’ सुरू आहे नियोजन

Advertisement
Advertisement

Leave a Reply