Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ देशात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; जाणून घ्या, कशामुळे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण

नवी दिल्ली : जगात कोरोना विषाणू नियंत्रणात येत असताना काही देशात मात्र या आजाराने परिस्थिती सातत्याने खराब होत आहे. कोरोनाचा प्रकोप येथे वेगाने वाढत चालला आहे. युरोपातील काही देश या संकटातून अजूनही बाहेर पडलेले नाहीत. या विकसित देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे येथे कोरोना वेगाने फैलावत चालल्याचे दिसून आले आहे. युरोपातील लाटव्हिया या लहान देशात तर एक महिन्याचा कठोर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ब्रिटेमध्येही कोरोनाचे रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने येथील आरोग्य यंत्रणेवरील ताण अनेक पटींनी वाढला आहे.

Advertisement

रशिया या देशात तर कोरोना अक्षरशः आऊट ऑफ कंट्रोल होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात येत आहे. देशात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे येथे अशी भीषण परिस्थिती उद्भवल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवणे लोकांच्यात हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संशय मनात न ठेवता लसीकरण करावे, असे आवाहन येथील सरकारने केले आहे.

Advertisement

देशात अत्यंत संथ गतीने लसीकरण होत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात असतानाही आतापर्यंत फक्त 35 टक्के लसीकरण झाले आहे. लोकांनी लसीकरण करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याचा फारसा फरक पडताना दिसत नाही. याचा परिणाम म्हणून काही दिवसांपासून रुग्ण संख्या वेगाने वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 34 हजार नवे रुग्ण सापडले. तसेच 2 लाख 26 हजार 353 लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. युरोपातील अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त आहे.

Advertisement

बापरे.. आता ‘या’ देशात कोरोनाचा विस्फोट; एक महिना राहणार कठोर लॉकडाऊन

Advertisement

धक्कादायक : ब्रिटनमध्ये नव्या रूपात आलाय कोरोना विषाणू.. काय केलाय त्याने कहर

Advertisement
Advertisement

Leave a Reply