Take a fresh look at your lifestyle.

वाव.. दुबईत आहे टीम इंडियाचे शानदार रेकॉर्ड; पाकिस्तानलाही दिलाय झटका; पहा, कसा राहिलाय इथला ट्रेंड

नवी दिल्ली : आयपीएल नंतर आता टी 20 विश्वकप स्पर्धेस सुरुवात झाली आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयने केले असून युएई आणि ओमान या देशात सामने होत आहेत. येत्या 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. अनेक वर्षांनंतर दोन्ही संघात सामना होत आहे. या सामन्याआधी अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. आणि दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता हा सामना अटीतटीचा होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, ते काहीही असले तरी इतिहास काही वेगळेच सांगत आहे.

Advertisement

हा सामना दुबईतील ज्या स्टेडीयममध्ये होत आहे. तेथे भारतीय संघाचे रेकॉर्ड शानदार राहिले आहे. या मैदानावर टीम इंडियाने अद्याप पराभव स्वीकार केलेला नाही. त्यामुळे यावेळी भारतास मात देणे पाकिस्तानला शक्य होईल याची शक्यता खूप कमी आहे. तसेही विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव करणे पाकिस्तानला एकदाही शक्य झालेले नाही. यावेळी शक्य होईल, असे आजिबात वाटत नाही. कारण, सध्याचा भारतीय संघ पाकिस्तानी संघाच्या तुलनेत जास्त मजबूत आहे.

Advertisement

भारतीय संघाने दुबईत आतापर्यंत सहा सामन्यात पाच सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. या दरम्यान भारताने दोन वेळेस पाकिस्तानचा पराभव केला आहे. टी 20 विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान विरोधात भारताचे रेकॉर्ड जबरदस्त राहिले आहे. टी 20 विश्वकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. तसेच टी 20 फॉर्मेटचे पूर्ण रेकॉर्ड पाहिले तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान आठ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने सहा तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

Advertisement

एकूणच, भारताचे पाकिस्तान विरोधात रेकॉर्ड शानदार राहिले आहे. आताही भारताचा संघ मजबूत असून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. याआधीच्या दोन्ही सराव सामन्यात भारताने अगदीच शानदार विजय मिळवले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानची सुरुवातच पराभवाने झाली आहे. काल सराव सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला.

Advertisement

टी 20 विश्वचषक : सलग सात विश्वचषक खेळणारा पहिला भारतीय ठरेल `हा`खेळाडू

Advertisement

बाब्बो.. भारताच्या पैशांवरच चालतयं की पाकिस्तानचे क्रिकेट; पहा, कुणी केलाय ‘हा’ खळबळजनक खुलासा

Advertisement
Advertisement

Leave a Reply