Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ साठी मोदी सरकार करतेय खास प्लान; खासगी कंपन्यांचीही घेणार मदत; नागरिकांचाही होणार फायदा

नवी दिल्ली : देशातील वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. निदान सणासुदीच्या काळात तरी या दरवाढीतून दिलासा मिळेल असे वाटत आहे. त्यासाठी मोदी सरकारने आता वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच केंद्र सरकार आणखी एक खास प्लान तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने जर या पद्धतीने कार्यवाही केली तर इंधनाचे भाव कमी होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

भारत सरकार एक असा गट तयार करत आहे, ज्यामध्ये सरकारी आणि खासगी रिफायनरी कंपन्या एकत्र आणल्या जाणार आहेत. जेणेकरून हा गट कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) आयातीवर परिणामकारक निर्णय घेऊ शकेल. पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी मंगळवारी (१९ ऑक्टोबर) रॉयटर्सला ही माहिती दिली. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा देश आहे. एकूण गरजेच्या सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आयात केले जाते आणि त्यातील बहुतेक कच्चे तेल हे मध्य-पूर्व तेल उत्पादक देशांकडून खरेदी करण्यात येते.

Advertisement

कंपन्या संयुक्त धोरण ठरवू शकतात आणि जेव्हा शक्य असेल, तेव्हा संयुक्तपणे वाटाघाटी करू शकतात. यापूर्वीही एकदा सरकारी आणि खासगी रिफायनरी कंपन्यांनी एकत्र चर्चा केली होती, ज्यामुळे तेल खरेदीत चांगली सवलत मिळाली, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशात आज इंधनाच्या वाढत्या किंमती हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. काही केल्या दर कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या मुद्द्यावर राजकारणही जोरात सुरू आहे. सध्याच्या सण उत्सवांच्या काळात दरवाढ कमी करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे सरकारनेही आता या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. तेलाचे दर कमी होतील तेव्हा होतील, मात्र आता देशातील इंधनाचे भाव कमी करणे जास्त महत्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाचे दर काही प्रमाणात कमी होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

.. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होतील कमी; मोदी सरकार ‘तो’ निर्णय घेण्याची शक्यता

Advertisement

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सुरूच : ऑक्टोबर महिन्यात इतक्यावेळा वाढले इंधन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply