Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानमध्येही आंदोलन; पहा, का होतोय सरकारचा विरोध.. ?

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाने सगळ्याच देशांना हैराण केले आहे. गरीब आणि विकसनशील देशांना या संकटाचा मोठा फटका बसला आहे. त्यात आता अनेक देशात महागाईने अगदीच विक्राळ रुप धारण केले आहे. भारतात तर महागाई रोजच नवे रेकॉर्ड करत आहे. अशीच परिस्थिती शेजारच्या देशांमध्ये सुद्धा आहे. श्रीलंकेत तर महागाई ऑऊट ऑफ कंट्रोल आहे. अशीच काहीशी परिस्थिती शेजारी पाकिस्तान मध्ये निर्माण झाली आहे.

Advertisement

या महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी या मुद्द्याचे राजकारण करत सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या असेच घडत आहे. देशातील वाढत जाणाऱ्या महागाईच्या विरोधात इम्रान खान सरकार विरोधात देशव्यापी आंदोलनास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्षांनी विरोध आंदोलन सुरू केले असून त्यास नागरिकांचाही पाठिंबा मिळत आहे.

Advertisement

डॉन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान डेमोक्रेटीक मूव्हमेंट पक्षाने 20 ऑक्टोबरपासून सरकार विरोधात पंधरा दिवसांच्या आंदोलनास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकार विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Advertisement

पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यानंतर सरकारने एलपीजी गॅस आणि वीज दरवाढ केली. खाद्य पदार्थांचे दर सुद्धा भरमसाठ वाढले आहेत. या वाढत्या महागाईस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाद्वारे सरकारचा विरोध करण्यात येत आहे. महागाईने हैराण झालेल्या नागरिकांचा या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

पाकिस्तानवर आधीच अब्जावधींचे कर्ज आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आधिकचे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आता देशात वाढत जाणाऱ्या महागाईने सरकारला आधिकच संकटात टाकले आहे. आता या संकटावर सरकार काय मार्ग शोधणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

बाब्बो.. कंगाल पाकिस्तानला पाहिजे ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; पहा, या देशावर का आलीय अशी वेळ ?

Advertisement

पाकिस्तान आणखी संकटात…! ‘तो’ निर्णय घेतला गेला तर होणार ‘त्या’चाही दुष्काळ; पहा, काय सुरू आहे राजकारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply