Take a fresh look at your lifestyle.

कर्जमाफी राहिली दूर, वसुलीसाठी आता बॅंकांचा तगादा, योजनेपासून इतके शेतकरी वंचित..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापना होताच मोठा गाजावाजा करीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून योजनेची स्थिती आहे, तशीच आहे.

Advertisement

ठाकरे सरकारने कर्जमुक्तीची घोषणा करताना, शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते, तर जे शेतकरी चालू बाकीत आहेत, त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला दोन वर्षे झाली, तरी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचे समोर येत आहे.

Advertisement

एकीकडे अनेकांची कर्जे माफ झालेली नसताना, थकीत व्याजासाठी बॅंका आता शेतकऱ्यांच्या मागे लागल्या आहेत. कर्जवसुलीसाठी अनेक ठिकाणी तगादा सुरु झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

Advertisement

सरकारची घोषणा हवेतच विरल्याचा सूर वाढत आहे. स्थानिक पातळीवर योजनेची अंमलबजावणी ही यशस्वीरित्या झाली नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचे समोर येतेय.

Advertisement

कर्जमाफीसाठी 500 कोटींची तरतूद न झाल्याने, राज्यातील 63 हजार शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले आहेत. मात्र, हा मुद्दा डिसेंबरअखेर निकाली काढला जाईल. याेजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पीक कर्ज देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या पीक कर्जमाफी आता डिसेंबरमध्ये तरी पुर्णत्वास येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याचे शासनाचे धोरण होते. मात्र, अद्याप या अनुषंगाने राज्य सरकारने हा निधी बॅंकेत जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित व्याजही भरावे लागणार असल्याचे बॅंकाकडून सांगितले जात आहे.

Advertisement

बाब्बो.. कंगाल पाकिस्तानला पाहिजे ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; पहा, या देशावर का आलीय अशी वेळ ?
अर्र.. आता ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानमध्येही आंदोलन; पहा, का होतोय सरकारचा विरोध.. ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply