Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदीच्या दरात तेजी..! आज पुन्हा सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

मुंबई : सध्याच्या सणासुदीच्या दिवसात सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज देशात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज गुरुवारी डिसेंबर वायदा सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55 रुपयांनी वाढली. त्याच बरोबर डिसेंबर वायदामध्ये चांदीच्या दरात 137 रुपयांची वाढ झाली. जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये गुरुवारी सोन्याच्या दरात 55 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 47,554 रुपये इतका झाला. चांदीचा भाव 137 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 65,744 रुपयांपर्यंत पोहोचला.

Advertisement

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply