Take a fresh look at your lifestyle.

वाव.. भारताने ‘त्या’ मध्ये केलीय दमदार कामगिरी; गाठलाय ‘तो’ महत्वाचा टप्पा; पहा, भारताने कशात मिळवले यश

नवी दिल्ली : कोरोना विरोधातील संघर्षात आज भारताने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत महत्वाचा टप्पा गाठला आहे. भारताच्या या दमदार कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. तसेही आता देशात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यांनी निर्बंधात आधिक सवलती दिल्या आहेत.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशास जबरदस्त फटका बसला होता. याच काळात देशभरात ऑक्सिजन आणि कोरोना प्रतिबंधक लसींची मोठी कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला होता. त्यानंतर काही काळानंतर परिस्थितीत सुधारणा होत गेली. ऑक्सिजन टंचाई आणि लसींच्या कमतरतेचा मुद्दा निकाली काढण्यात सरकारला यश आले. लस निर्माता कंपन्यांना वेगाने लस निर्मिती करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर देशभरात वेगाने लस तयार करण्यात आल्या. जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

Advertisement

सुरुवातीच्या दिवसात राज्यांना पुरेशा प्रमाणात लस मिळत नव्हत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत होती. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार दरम्यान आरोप-प्रत्यारोपही सुरू होते. केंद्र सरकारने लस पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने नियोजन केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून  आले.  लस उत्पादन वाढले त्यामुळे राज्यांना पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन देणेही शक्य झाले. सध्या देशात कुठेही लस टंचाई नाही.

Advertisement

जानेवारी महिन्यात लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. सुुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरण केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. आज देशाने  100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा महत्वाचा टप्पा गाठला आहे.

Advertisement

दरम्यान, आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी यापूर्वी सांगितले होते, की 100 कोटी डोस दिल्यानंतर, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना लवकरच दुसरा डोस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या 31 टक्के लोकांनी दुसरा डोस देखील घेतला आहे.

Advertisement

कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री टोपे यांचे महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

Advertisement

लसीकरण करा, नाहीतर नोकरी नाही पगारही मिळणार नाही; पहा, कोणत्या विमान कंपन्यांनी घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply