Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! महागाई भत्त्यात केलीय इतकी वाढ; पहा, सरकारने काय घेतलाय निर्णय

नवी दिल्ली : दिवाळीचा सण जवळ आलेला असताना मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरणार आहे. केंद्रीय नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ प्रस्तावित होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन वाढून 31 टक्के इतका झाला आहे. केंद्र सरकारकडून लवकरच याबाबत आधिकृत घोषणा करणार आहे.

Advertisement

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी  महागाई भत्त्यात वाढ करत दिवाळी भेट दिली आहे. आता या कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए प्रमाणे पैसे मिळणार आहेत.

Advertisement

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यामध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती. ज्यामुळे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला. आता डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे एप्रिल महिन्यात अर्थ मंत्रालयाने महागाई भत्त्यात वाढ (डीए) 30 जून 2021 पर्यंत दिलेली नव्हती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए दर 17 टक्के होता.

Advertisement

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, घरभाडे भत्यात वाढ केली गेली आहे, कारण DA 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात वाढ करत 27 टक्के केला आहे.

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारावर महागाई भत्ता दिला जातो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वेगळा आहे. महागाई भत्त्याची गणना मूळ पगारावर केली जाते. भत्ता गणनेसाठी एक पद्धत निश्चित केली गेली आहे. त्यानुसार सरकारकडून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित केला जातो.

Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दणकून दिवाळी बोनस, सरकारने काय निर्णय घेतलाय वाचा..

Advertisement

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी..! ‘पीएफ’ व्याजाचे पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता; पहा, काय आहे सरकारचे नियोजन

Advertisement
Advertisement

Leave a Reply