Take a fresh look at your lifestyle.

वाव.. रिलायन्स जियो सुपरफास्ट..! एअरटेल, व्होडाफोन-आयडीयालाही टाकले मागे; पहा, कशात केलीय दमदार कामगिरी

नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. रिलायन्स जियो कंपनीने या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर तर ही स्पर्धा अनेक पटीने वाढली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सध्या जियो आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आताही जियोने असाच एक कारनामा केला असून अन्य सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. टेलिकॉम क्षेत्रात जियोचा दबदबा कायम आहे.

Advertisement

सप्टेंबर महिन्यातील अहवाल ट्रायने जाहीर केला असून रिलायन्स जियो पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीने देशातील अन्य दिग्गज एअरटेल आणि व्होडाफोन-आयडीया कंपन्यांनाही मागे टाकले आहे. जियो कंपनीने सप्टेंबर महिन्यात 20.9 मेगाबिट प्रति सेकंद (MBPS) स्पीड सरासरी डाऊनलोड दर सोबत 4 जी स्पीड चार्टमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Advertisement

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन-आयडीया 7.2 एमबीपीएस डेटा स्पीडसह अपलोड सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सप्टेंबर महिन्यात जियोच्या 4 जी नेटवर्क स्पीडमध्ये जवळपास 15 टक्के वाढ झाली आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडीया यांचे नेटवर्क स्पीड दर महिन्यास अनुक्रमे 85 आणि 60 टक्के असा राहिला आहे. सप्टेंबर महिन्यात व्होडाफोन-आयडीयाचा सरासरी अपलोड स्पीड 7.2 एमबीपीएस होता. यानंतर रिलायन्स जियो 6.2 आणि एअरटेल 4.5 असा स्पीड आहे. देशभरात मिळवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे हा डेटा जारी करण्यात आला आहे.

Advertisement

देशात सध्या मोबाइल क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मोबाइल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. या क्षेत्रात रिलायन्स जियो कंपनीने आघाडी घेतला आहे. अन्य मोबाइल कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी काळात जियोने दमदार कामगिरी केली आहे. त्याचा फटका अन्य कंपन्यांना बसला आहे.

Advertisement

अर्र.. आज येणारा जियोचा स्मार्टफोन आता मिळणार दिवाळीत; कंपनीने अचानक बदलला निर्णय; पहा, नेमके काय म्हटलेय कंपनीने

Advertisement

म्हणून यावर्षी जगभरातील मोबाइल इंडस्ट्रीला बसणार झटका; पहा, कशामुळे आलीय ‘ही’ वेळ

Advertisement
Advertisement

Leave a Reply