Take a fresh look at your lifestyle.

.. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होतील कमी; मोदी सरकार ‘तो’ निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने देशातील तेल कंपन्यांनी दर वाढ केली आहे. ऑक्टोबर महिन्यात तर सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. आता दिवाळीचा सण जवळ आला आहे. निदान या सणात तर देशातील महागाई कमी होईल, असे लोकांना वाटत आहे. सरकारलाही याची जाणीव आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळात केंद्र सरकार याबाबत महत्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे.

Advertisement

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. कोरोना महामारीनंतर प्रथमच असा निर्णय सरकार घेऊ शकते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती कमी करण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी तेल उत्पादक देशांकडे पाठपुरावा सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी ठेवण्याचे आवाहन भारताने या देशांना केले आहे. याबाबत तेल उत्पादक देशांनी अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. कारण, सध्या जगभरात तेलास मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत तितका पुरवठा होत नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशातही इंधनाचा भडका उडाला आहे.

Advertisement

या वाढलेल्या इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती आहे. पेट्रोलच्या किंमतीत जानेवारी महिन्यापासून 30 ते 35 रुपये वाढ झाली आहे. तर डिझेलही 26 ते 30 रुपयांनी वाढले आहे. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईतही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीत नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला तर सरकारच्या महसूलात वर्षभरात 25 हजार कोटी रुपये घट होणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी होतील.

Advertisement

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सुरूच : ऑक्टोबर महिन्यात इतक्यावेळा वाढले इंधन दर

Advertisement

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका : कोणत्या शहरात मिळतेय देशभरातील सर्वात महाग पेट्रोल

Advertisement
Advertisement

Leave a Reply