Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘या’ पठ्ठ्याने दिलेय थेट पवारांनाच आव्हान; वाचा नेमका काय आहे विषय..!

पुणे : राजकारणात कोणालाही विरोध असतोच. मात्र, अनेकदा दिग्गज वाटणाऱ्या नेत्यांनाही हा विरोध चुकलेला नाही. हीच तर लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकांची खरी खासियत आहे. तसाच प्रकार झाल्याने आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धनंजय शिंदे यांनीही आव्हान दिले आहे.

Advertisement

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेल्या आणि देशाच्या राजकारणात पकड असलेल्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा या संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांना यंदा आव्हान दिले आहे ते आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांचे. याबाबत शिंदे यांनी आपली भूमिका ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी यामध्ये म्हटलेय की, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलाय, पण मला मतदानाचा अधिकार नाही!!! निवडणूक अधिकाऱ्यांना विनंत्या व करून देखील सर्व उमेदवार व सुमारे ६००० जणांच्या मतदानाचा हक्क डावलून फक्त ३४ जणांनाच अधिकार दिला गेलाय. संस्थेतील सर्व नामवंत शांत बसले आहेत.

Advertisement

आपण नेमकी ही निवडणूक का लढवत आहोत याबाबतही शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटलेय की, आदरणीय शरद पवार साहेब देशातील जाणते नेते आहेत. “ग्रंथालय बचाव समिती”ने संविधनिक मार्गाने पवार साहेब व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार व चर्चा करूनदेखील गेली ३+ वर्षे काहीही प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून समितीने निवडणुक लढायच ठरवलंय. तसेच “ही कशी पारदर्शक निवडणूक होणार? मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय आणि तो वैध्य ही आहे पण मला मतदानाचा हक्कच नाही,” हा मुद्दाही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. एकूणच लोकशाही मार्गाने निवडणुका अपेक्षित असताना मतदारांना मतदानाचा हक्क डावलून संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील असल्याचे आरोप यानिमित्ताने होत आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply