Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तब्बल ९९ टक्के मतदार ठरले अपात्र..? पहा नेमके काय चाललेय ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत..!

मुंबई : राजकीय निवडणुका जिंकण्यासाठी काय केले यापेक्षाही विजय कोणाचा झाला हाच मुद्दा भारत देशात महत्वाचा असतो. त्यासाठी अनेकदा साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली जाते. त्याचप्रमाणे मतदारांना अपात्रही केले जाते. तसाच प्रकार आता मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत झाल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि अनेक लेखक पदाधिकारी असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत नेमके काय चालले आहे असाच प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे.

Advertisement

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे की, सहा हजारापेक्षा जास्त मतदार असलेली ही संस्था आहे. मात्र, त्यातील अनेकांना डावलून फ़क़्त ३४ जणांना मतदान करण्याची ‘संधी’ देण्यात आलेली आहे. याकडे लक्ष वेधून गलगली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी न्यायालयीन लढाईत उतरण्याचे सांगितले आहे. लेखी पत्र देऊनही निवडणूक अधिकारी व संस्था प्रशासन यांनी घटना आणि नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement

गलगली यांनी माघार घेतल्याने आता या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांच्यात थेट सरळ लढत होत आहे. कार्यकारी मंडळाच्या १५ जागांसाठी फ़क़्त १५ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, उपाध्यक्षपदाच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष या पदासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. उमेदवार शिंदे यांनी याबद्दल म्हटले आहे की, ६००० + सभासदांच्या मतदानाचा हक्क डावलून फक्त ३४ जणांच्या मतदानातून निवडणूक घेणं ही घटना विरोधी कृती आहे. दुर्दैवानं निवडणूक अधिकारी याविषयी स्पष्ट उत्तरे देत नाहीत. पवार साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावे व आपली भूमिका स्पष्ट करावी ही विनंती.

Advertisement

तर, मायकल जी. वसई यांनी म्हटलेय की, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्षपद मिळवून काय मोठा लाभ होणार आहे, हे मला कळत नाही. शेवटी ह्या हे ग्रंथालय आहे. त्यामध्ये ज्ञानाची उपासना चालेल. शरद पवार साहेबआणि त्यांचा पक्ष एवढे का अध्यक्षपदासाठी आसुसले आहेत? कोणी समजावून देईल का मला? एकूणच या निवडणुकीत मतदारांना डावलून नेमके काय सध्या केले जाणार आहे असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पदाधिकारी निवडीसाठी २४ ऑक्टोबर २०२१ ला मतदान होत आहे. पवार साहेबांना किती मतदान होणार आणि उपाध्यक्षपदी कोण निवडले जाणार व कोण पडणार यामुळे निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply