Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य मंत्र : ब्रेन स्ट्रोकची लक्षणे हलक्यात घेऊ नका.. अन्यथा जीवावर बेतू शकते

मुंबई : आपल्या सभोवतालच्या गोष्टी,  आपला वेळीअवेळीचा आहार, अनियमित दिनचर्या, व्यायाम न करणे आदींमुळे आपल्याला आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या होतात. आपण आजारांपासून दूर राहावे प्रत्येकाला वाटते. परंतु, जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो की ज्यामुळे आपण त्यांना बळी पडतो.

Advertisement

ब्रेन स्ट्रोक हाही एक गंभीर प्रकार आहे. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा हे उद्भवते. हे मेंदूच्या उतींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. तर आम्ही तुम्हाला त्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत.

Advertisement

दिनचर्या बिघडली : रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मात्र सध्या स्पर्धेच्या युगात लोकांनी त्यांची दिनचर्या बिघडवली आहे. झोपेची किंवा उठण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.

Advertisement

धूम्रपान आणि अल्कोहोल : बिडी-सिगारेटचे सेवन आपल्याला स्ट्रोकसारख्या आजारांनी ग्रस्त करण्याचे काम करतात. तज्ञ सहमत आहेत की धूम्रपान केल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका जवळपास दुप्पट होतो. त्याच वेळी अल्कोहोलचे सेवन केल्याने स्ट्रोकदेखील होऊ शकतो. म्हणून असे मानले जाते की दररोज दोनपेक्षा जास्त पेये पिऊ नयेत. कारण असे केल्याने रक्तदाब वाढतो.

Advertisement

व्यायाम न करणे : आजकाल अनेक तरुण व्यायामच करत नाहीत.  कारण ते आतून आळशी असतात. ते व्यायाम करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कसरत करत नाहीत. त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढतो. यामुळे मग ते स्ट्रोकसारख्या जोखमींनादेखील कारणीभूत ठरतात.

Advertisement

ही आहेत लक्षणे : काही गोष्टी समजण्यात अडचण, बोलण्यात अडचण, चक्कर येणे, मानसिक संतुलन कमी होणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये दृष्टी कमी होणे, अंधुक दिसणे आणि शरीराच्या दोन्ही बाजूंना अस्पष्टता. हात किंवा पाय सुन्न होणे, अशी काही ब्रेन स्ट्रोकची अनेक लक्षणे आहेत. ती दिसल्यानंतर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ डॉक्टरांकडे जायला हवे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply