Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. आता ‘या’ देशात कोरोनाचा विस्फोट; एक महिना राहणार कठोर लॉकडाऊन

नवी दिल्ली : दोन वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेला कोरोना आता नियंत्रणात येत आहे. जगातील अनेक देशात परिस्थिती सामान्य होत आहे. मात्र, अजूनही असे काही देश आहेत तिथे मात्र हा कोरोना थांबण्यास तयार नाही. ज्या चीनमधून हा घातक आजार जगभरात पसरला असे सांगितले जात आहे, त्या चीनमध्येच काही शहरात कोरोना वेगाने फैलावत आहे. तर युरोपमध्येही काही देश या आजाराच्या विळख्यातून बाहेर आलेले नाहीत. लाटव्हिया या देशात तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या देशात गुरुवारपासून महिनाभर कठोर लॉकडाऊन राहणार आहे.

Advertisement

या देशाची लोकसंख्या 19 लाख आहे. मात्र, या देशातील निम्म्याच लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे. देशभरात सध्या 1 लाख 90 हजार कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यात सरकार कमी पडले आहे, अशी कबुली या देशाच्या पंतप्रधानांनी दिली आहे. त्यामुळेच आज कोरोनाचा प्रसार वाढत असून देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली आहे.

Advertisement

रशिया या देशात सुद्धा कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. रशियामध्ये सुद्धा लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्याचे घातक परिणाम आता दिसत आहेत. काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. मृत्यूंचा आकडाही वाढला आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या भारतात आता परिस्थिती नियंत्रणात आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने कमी होत आहेत. लसीकरणाचा वेग वाढला आहे. देशातील तब्बल 99 कोटी लोकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी कमी झाला आहे. देशात लवकरच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार होईल. कोरोना नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारांनी निर्बंधात आधिक सवलती दिल्या आहेत.

Advertisement

धक्कादायक : ब्रिटनमध्ये नव्या रूपात आलाय कोरोना विषाणू.. काय केलाय त्याने कहर

Advertisement

कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री टोपे यांचे महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply