Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकत नाही; पहा, बीसीसीआयने नेमके काय कारण सांगितलेय..?

नवी दिल्ली : आयपीएल नंतर आता टी 20 विश्वकप स्पर्धेस सुरुवात झाली आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयने केले असून या स्पर्धा युएई आणि ओमान या देशात होत आहेत. येत्या 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. मात्र, याआधीच हा सामना रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या नागरिकांवर हमले होत आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना होऊ नये, असे अनेकांना वाटत आहे. मात्र, आता या मुद्द्यावर बीसीसीआयने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले, की आता हा सामना रद्द केला जाऊ शकत नाही. या सामन्यास भारताने होकार दिला आहे त्यामुळे आता ऐनवेळी भारतीय संघ माघार घेऊ शकत नाही.

Advertisement

काश्मीरमधील परिस्थिती सध्या बिघडली आहे. येथे दहशतवादी बाहेरच्या राज्यातील लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत हा क्रिकेटचा सामना होऊ नये, असे अनेकांना वाटत आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही या सामन्याबाबत प्रतिक्रिया देताना पुन्हा विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

Advertisement

त्यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शुक्ला म्हणाले, की आयसीसी स्पर्धांमध्ये एकदा सहभागी झाल्यानंतर क्रिकेट संघांना पुन्हा माघार घेणे कठीण असते. दहशतवादी संघटनांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण, भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामन्याच्या मुद्दा असेल तर तुम्ही कोणत्याही देशाविरोधात सामन्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्व देशांविरोधात सामने असतात, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.

Advertisement

तसे पाहिले तर, आयसीसीचेही काही नियम आहेत. या नियमांचा विचार केला तर भारत पाकिस्तान विरोधातील सामन्यास आता नकार देऊ शकत नाही, असे दिसत आहे. आयसीसीच्या नियमांनुसार आयससीचा सदस्य देश राजकीय कारणांमुळे दुसऱ्या देशाबरोबर सामन्यास नकार देऊ शकत नाही.

Advertisement

जर भारताने नकार दिला तर पाकिस्तान संघास विजयी घोषित केले जाईल. म्हणजेच,  सामना न होताच भारतास पराभव स्वीकारावा लागेल.

Advertisement

जर भारताने नकार दिला तर आयसीसीला सुद्धा मोठे नुकसान सहन करावे लागेल. आणि या नुकसानीची भरपाई बीसीसीआयला द्यावी लागेल.

Advertisement

अर्र.. BCCI नेही घेतलीय फिरकी; ‘तो’ निर्णय घेत सर्वांचे अंदाज केले फेल; पहा, ‘टी 20’ साठी असा आहे भारतीय संघ

Advertisement

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघांवर होणार बक्षिसांचा वर्षाव, पाहा कोणाला किती बक्षिस मिळणार…?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply