Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता टीव्ही सुद्धा देणार झटका..! ऐन महागाईच्या काळात होणार असे काही; नागरिकांचा त्रास वाढणार

नवी दिल्ली : देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईत आता टीव्हीची भर पडली आहे. होय, आता लवकरच टीव्हीच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. त्यामुळे आता करमणूक म्हणूनही टीव्ही पाहताना विचार करावा लागणार आहे. कारण, येत्या 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनेलची देयके वाढणार आहेत.

Advertisement

देशातील आघाडीच्या प्रसारण नेटवर्क झी, स्टार, सोनी आणि वायकॉम 18 ने काही चॅनेल त्यांच्या प्लॅनमधून काढून टाकले आहेत. ज्यामुळे टीव्ही दर्शकांना आता 50% अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किमती वाढत आहेत. मार्च 2017 मध्ये TRAI ने टीव्ही चॅनेल्सच्या किमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी करण्यात आला. यामुळे सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार त्यांच्या चॅनेलच्या किमती बदलत आहेत.

Advertisement

ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक मूल्य 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले गेले. परंतु ट्रायच्या नवीन दर आदेशात हे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले. अशा स्थितीत चॅनेल्सना त्यांचे बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देऊ करणे खूप खर्चिक ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी नेटवर्कने काही लोकप्रिय चॅनेल्स बुकमधून काढून त्यांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही प्रादेशिक चॅनेलसाठी लोकांना 35 ते 50 टक्के अधिक पैसे द्यावे लागतील.

Advertisement

देशात सध्या महागाई वेगाने वाढत आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढलेत. एलपीजी गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. खाद्यतेलांचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यानंतर आता टीव्हीच्या त्रासाची भर पडणार आहे.

Advertisement

बाब्बो.. सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने महागाई आऊट ऑफ कंट्रोल; ‘या’ देशात 2657 रुपयांत मिळतोय एलपीजी गॅस

Advertisement

आताच घ्या कार..! ऑगस्टमध्ये होणार भरमसाठ दरवाढ, महागाईमुळे ही कंपनी वाढवतेय कारच्या किमती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply