Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तान आणखी संकटात…! ‘तो’ निर्णय घेतला गेला तर होणार ‘त्या’चाही दुष्काळ; पहा, काय सुरू आहे राजकारण

नवी दिल्ली : कर्जाच्या विळख्यात अडकलेला आणि सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी आता जास्त वाढल्या आहेत. दहशतवादास खतपाणी देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे या देशाचे धोरणच आता अडचणीचे ठरू लागले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. असे घडले तर पाकिस्तानच्या अडचणी जास्त वाढतील.

Advertisement

आधीच पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आयएमएफने कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत जर एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवले तर पाकिस्तानसाठी हा मोठा झटका ठरणार आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) संघटनेची बैठक बुधवारी पॅरीस येथे होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानच्या 27 टप्प्यातील कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. मात्र, संघटनेने ज्या मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्यास सांगितले आहे, त्यानुसार कार्यवाही करणे पाकिस्तानला शक्य झालेले नाही.

Advertisement

दहशतवाद रोखण्याचा प्रयत्न केल्याचे पाकिस्तान कितीही सांगत असला तरी प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक मदत रोखण्यातही हा देश अपयशी ठरला आहे. त्यामुळे 2022 मधील एप्रिल महिन्यापर्यंत पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्येच राहण्याची जास्त शक्यता दिसत आहे.

Advertisement

एफएटीएफच्या 27 टप्प्यातील कार्ययोजनेतील सहा मुद्द्यांवर कार्यवाही करण्यास पाकिस्तान साफ अपयशी ठरला आहे. या सहा मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याशिवाय पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. याआधी जूनमध्ये झालेल्या बैठकीत एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

आता जर पाकिस्तानमधील परिस्थिती आधिक बिघडली तर आणखी कठोर निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. या संकटापासून सुटका करुन घ्यायची असेल तर एफएटीएफने ठरवून दिलेल्या 27 मानकांवर समाधानकारक कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे. आता पाकिस्तान पुढे काय कार्यवाही करणार यावर एफएटीएफ संघटना निर्णय घेणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीत संघटना पाकिस्तानबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

कंगाल पाकिस्तानला आणखी एक झटका..! जाणून घ्या, मित्र असणाऱ्या चीनने काय केले.. ?

Advertisement

अरे बापरे.. पाकिस्तानला चीनपाठोपाठ आयएमएफने दिला मोठा धक्का.. जाणून घ्या, काय केले?

Advertisement

अर्र.. पाकिस्तानचा ‘तो’ प्लान अखेर फसलाच..! भारताचे नाव आता टाळता येणारच नाही, पहा, काय घेतलाय निर्णय..?

Advertisement

बाब्बो.. पाकिस्तानमध्ये आता ‘त्या’चाही दुष्काळ; ‘त्या’ यादीत आल्याने कर्ज मिळणेही होणार कठीण

Advertisement
Advertisement

Leave a Reply