Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर असा रिकामा होतोय आपला खिसा; ‘या’ काँग्रेस नेत्याने सांगितलेय सरकारी वसुलीचे गणित

नवी दिल्ली : देशात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरुन काँग्रेस पक्षाने केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव दराच्या माध्यमातून मोदी सरकार एक प्रकारे वसुली करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. इतकेच नाही तर आताचे सरकार आतापर्यंतचे सर्वाधिक लोभी सरकार असल्याचीही टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.

Advertisement

‘करांच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर ग्राहकांच्या खिशातून केंद्र सरकार जबरदस्तीने वसुली करत आहे’, अशा शब्दांत चिदंबरम यांन केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. पेट्रोलच्या किंमतीच्या एक तृतियांश भाग हा केंद्र सरकारचा कर आहे. एखाद्या वस्तूवर ३३ टक्के कर आकारणे म्हणजे जबरदस्तीने वसुली करण्यासारखेच आहे, असे त्यांनी एनडीटीव्ही न्यूज चॅनेलला सांगितले.

Advertisement

चिदंबरम यांनी इंधनाच्या वाढत्या किंमतीवर आधिक स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोलसाठी ग्राहक ज्यावेळी 102 रुपये देतो, त्यातील 42 रुपये तेल कंपन्यांकडे जातात. यामध्ये कच्च्या तेलावरील प्रक्रियेचाही समावेश आहे. 33 रुपये केंद्र सरकारकडे आणि 24 रुपये राज्य सरकारकडे कर रुपाने जमा होतात. तर 4 रुपये संबंधित डिलरला मिळतात. या पद्धतीने सरकार जवळपास 33 टक्के कर वसुली करते, असे चिदंबरम यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, आजही तेल कंपन्यांनी नागरिकांना कोणताच दिलासा दिलेला नाही. ऑक्टोबर महिना लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. कारण, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच इंधनाच्या किमती वाढत आहेत. या महिन्यात आतापर्यंत 13 वेळेस इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधनाचे भाव वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दरवाढीद्वारे सरकारला घसघशीत उत्पन्न मिळत आहे. दुसरीकडे मात्र, या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

Advertisement

बाब्बो.. आता ‘या’ शहरात डिझेलने केलेय शतक; पेट्रोलही मिळतेय 111 रुपये लिटर; पहा, आज काय आहेत भाव

Advertisement

इंधन दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट; ‘ते’ कारण देत पेट्रोलियम कंपन्यांनी केली दरवाढ; जाणून घ्या, आज कितीने वाढलेत भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply